प्रचार प्रक्रियेत मुलांचा वापर करू नका : निवडणूक आयाेग

पुढारी ऑनलाईन डेस्क: आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय निवडणूक आयोगाने आज (दि.५) एक नोटीस प्रसिद्ध केली आहे. आयोगाने या माध्यमातून पक्ष, उमेदवार आणि निवडणूक यंत्रणांना निर्देश जारी केले आहे. यामध्ये लहान मुलांचा निवडणूक प्रक्रिया आणि यंत्रणेत वापर करू नये, अशी सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. (ECI On Childrens) प्रचार प्रक्रियेत रॅली, घोषणाबाजी, पोस्टर्स किंवा … The post प्रचार प्रक्रियेत मुलांचा वापर करू नका : निवडणूक आयाेग appeared first on पुढारी.

प्रचार प्रक्रियेत मुलांचा वापर करू नका : निवडणूक आयाेग

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय निवडणूक आयोगाने आज (दि.५) एक नोटीस प्रसिद्ध केली आहे. आयोगाने या माध्यमातून पक्ष, उमेदवार आणि निवडणूक यंत्रणांना निर्देश जारी केले आहे. यामध्ये लहान मुलांचा निवडणूक प्रक्रिया आणि यंत्रणेत वापर करू नये, अशी सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. (ECI On Childrens)
प्रचार प्रक्रियेत रॅली, घोषणाबाजी, पोस्टर्स किंवा पॅम्प्लेटचे वाटप किंवा निवडणूक-संबंधित अन्‍य प्रचारात मुलांना सहभागी करू नये. राजकीय नेते आणि उमेदवारांनी लहान मुलांना हातात धरून, वाहनात किंवा रॅलीमध्ये घेऊन जाणे यासह कोणत्याही प्रकारे प्रचाराच्या कामांसाठी मुलांचा वापर करू नये, असे देखील निवडणुक आयोगाने स्पष्ट केले आहे. यासाठी निवडणूक आयोगाने निवडणुकमध्ये मुलांच्या वापरासंबंधित ‘झिरो टॉलरन्स’चा उल्लेख केला आहे. (ECI On Childrens)

Political Parties and candidates should refrain from using children in political campaigns and rallies in any manner, says Election Commission of India pic.twitter.com/jFqNmdhR7i
— ANI (@ANI) February 5, 2024

ECI On Childrens: निवडणूक प्रचार प्रक्रियेत हे टाळा 
निवडणुक आयोगाने प्रचार प्रक्रियेदरम्यान मुलांना बंदी घालताना कविता, गाणी, उच्चारलेले शब्द, राजकीय पक्ष/उमेदवार यांच्या चिन्हाचे प्रदर्शन, राजकीय पक्षाच्या विचारसरणीचे प्रदर्शन, राजकीय कामगिरीचा प्रचार यासह कोणत्याही प्रकारे गैर-राजकीय मोहिमेचे स्वरूप निर्माण करण्यासाठी मुलांचा वापर या गोष्टींचा समावेश आहे. (ECI On Childrens)
बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) अधिनियमाचे पालन करावे
सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) अधिनियम, १९८६ चे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. तसेच यामध्ये २०१६ नुसार बालकामगार कायदा (प्रतिबंध आणि नियमन) सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार राजकीय पक्षांनी निवडणुकीशी संबंधित कोणत्याही कामात अल्पवयीन मुलांना सहभागी होऊ देणार नाही याची खात्री करा, असे निर्देशही दिले आहेत.
नियमाचे उल्लंघन केल्यास कठोर शिस्तभंगाची कारवाई
संबंधित सर्व संबंधित कायदे आणि कायद्यांचे पालन सुनिश्चित करण्याची वैयक्तिक जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक अधिकारी घेतील. त्यांच्या अखत्यारीतील निवडणूक यंत्रणेने या तरतुदींचे कोणतेही उल्लंघन केल्यास कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे देखील भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे.
हेही वाचा:

Jharkhand Floor Test: चंपाई सोरेन यांनी विश्वासदर्शन ठराव जिंकला
Pimpri : राष्ट्रवादीकडून बूथनुसार मतदार यादीवर लक्ष
Hemant Soren : माझ्या अटकेत राजभवनाचा हात : हेमंत सोरेन यांचा विधानसभेत आरोप

Latest Marathi News प्रचार प्रक्रियेत मुलांचा वापर करू नका : निवडणूक आयाेग Brought to You By : Bharat Live News Media.