पाकिस्तानमध्‍ये पोलिस स्टेशनवर दहशतवादी हल्ला; १० ठार, अनेक जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क: पाकिस्तानच्या वायव्य भागात एका पोलीस ठाण्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 10 पोलीस कर्मचारी ठार झाले तर सहा जण जखमी झाले आहेत. या आठवड्याच्या अखेरीस होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांनी  आज( दि.५) माध्यमांशी बोलताना सांगितले. (Terrorist Attack In Pak) Terrorist Attack In Pak: शॉपिंग बॅगमध्ये … The post पाकिस्तानमध्‍ये पोलिस स्टेशनवर दहशतवादी हल्ला; १० ठार, अनेक जखमी appeared first on पुढारी.

पाकिस्तानमध्‍ये पोलिस स्टेशनवर दहशतवादी हल्ला; १० ठार, अनेक जखमी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: पाकिस्तानच्या वायव्य भागात एका पोलीस ठाण्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 10 पोलीस कर्मचारी ठार झाले तर सहा जण जखमी झाले आहेत. या आठवड्याच्या अखेरीस होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांनी  आज( दि.५) माध्यमांशी बोलताना सांगितले. (Terrorist Attack In Pak)
Terrorist Attack In Pak: शॉपिंग बॅगमध्ये ठेवला होता बॉम्ब
कराचीच्या रेड झोन भागात असलेल्या ईसीपी कार्यालयाच्या भिंतीजवळ एका शॉपिंग बॅगमध्ये स्फोटक सामग्री ठेवण्यात आली होती, अशी माहिती ‘रॉयटर्स’ने दिली आहे. तपासा दरम्यान स्फोटक पदार्थात बॉल बेअरिंग नव्हते, असेही स्पष्ट झाले आहेत. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने या या घटनेनचा जिल्हा देखरेख अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) दक्षिण यांच्याकडून अहवाल मागवला आहे. (Terrorist Attack In Pak)
एका आठवड्यात अनेक स्फोट
गेल्या पाच दिवसांत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर दोनदा बॉम्बस्फोट झाले आहेत. बलुचिस्तानमधील नुष्की जिल्ह्यात रविवारी (दि.४) पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या (ECP) कार्यालयाबाहेर स्फोट झाला. मात्र, या स्फोटात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. (Terrorist Attack In Pak)
हेही वाचा:

Terrorist Attack in Kashmir:जम्मू काश्मीरमध्ये मशिदीवर दहशतवादी हल्ला; निवृत्त पोलिस अधिकारी ठार
Jammu Terror Attack : पुंछमध्ये लष्करी वाहनावर दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद
Terrorist Attack in Pak : पाकिस्तानात पोलिस चौकीवर पुन्हा दहशतवादी हल्ला; ५ ठार

Latest Marathi News पाकिस्तानमध्‍ये पोलिस स्टेशनवर दहशतवादी हल्ला; १० ठार, अनेक जखमी Brought to You By : Bharat Live News Media.