श्रीकांत शिंदेंच्या वाढदिनी ‘त्या’ गुंडाची भेट घडवणाऱ्या युवासेना पदाधिकाऱ्याची हकालपट्टी

पुढारी ऑनलाईन डेस्क : काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला वर्षा बंगल्यावर चक्क कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने भेट घेतल्याची माहिती समोर आली. या भेटीचा फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत हा फोटो पोस्ट केलाय. त्यांनी मा. गृहमंत्री देवेन्द्रजी … The post श्रीकांत शिंदेंच्या वाढदिनी ‘त्या’ गुंडाची भेट घडवणाऱ्या युवासेना पदाधिकाऱ्याची हकालपट्टी appeared first on पुढारी.
श्रीकांत शिंदेंच्या वाढदिनी ‘त्या’ गुंडाची भेट घडवणाऱ्या युवासेना पदाधिकाऱ्याची हकालपट्टी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला वर्षा बंगल्यावर चक्क कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने भेट घेतल्याची माहिती समोर आली. या भेटीचा फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत हा फोटो पोस्ट केलाय.
त्यांनी मा. गृहमंत्री देवेन्द्रजी असा उल्लेख करत गुंडांचे इतके बळ का वाढले? असा सवाल उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय –
मा. गृहमंत्री देवेन्द्रजी
जय महाराष्ट्र!
महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात! गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीस जबाबदार कोण? काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल? गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत! या फोटोनंतर ही भेट घडवून आणणाऱ्या युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षकाची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
कोण आहे गुंड हेमंत दाभेकर?
गुंड हेमंत दाभेकर हा किशोर मारणेच्या खून प्रकरणात शरद मोहळसोबत शिक्षा भोगत होता, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाख असून अपहरण, खंडणी, खुनाचा प्रयत्न, पैसे उकळणे, खून असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

मा. गृहमंत्री देवेन्द्रजी
जय महाराष्ट्र!
महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे.पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात!
गुंडांचे इतके बळ का वाढले?
या परिस्थितीस जबाबदार कोण?
काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील… pic.twitter.com/jnmgurI5gm
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 5, 2024

Latest Marathi News श्रीकांत शिंदेंच्या वाढदिनी ‘त्या’ गुंडाची भेट घडवणाऱ्या युवासेना पदाधिकाऱ्याची हकालपट्टी Brought to You By : Bharat Live News Media.