मोठी बातमी: चंपाई सोरेन यांनी विश्वासदर्शन ठराव जिंकला

पुढारी ऑनलाईन डेस्क: झारखंडमधील प्रचंड राजकीय उलथापलथीनंतर ‘झामुमो’चे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांनी झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून २ फेब्रुवारीला शपथ घेतली. त्यानंतर राज्यपालांनी चंपाई सरकारला बहुमत साध्य करण्यास सांगितले. यानुसार आज सोरेन सरकारने ४७ आमदारांच्या पाठींब्याने बहुमत चाचणी जिंकली. त्यानंतर विधानसभेत आवाजी मतदाने चंपाई सोरेन सरकारवर पुन्हा शिक्कामोर्तब झाला. अखेर झारखंड मुक्ती मोर्चाला सरकार अबाधित ठेवण्यात … The post मोठी बातमी: चंपाई सोरेन यांनी विश्वासदर्शन ठराव जिंकला appeared first on पुढारी.

मोठी बातमी: चंपाई सोरेन यांनी विश्वासदर्शन ठराव जिंकला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: झारखंडमधील प्रचंड राजकीय उलथापलथीनंतर ‘झामुमो’चे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांनी झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून २ फेब्रुवारीला शपथ घेतली. त्यानंतर राज्यपालांनी चंपाई सरकारला बहुमत साध्य करण्यास सांगितले. यानुसार आज सोरेन सरकारने ४७ आमदारांच्या पाठींब्याने बहुमत चाचणी जिंकली. त्यानंतर विधानसभेत आवाजी मतदाने चंपाई सोरेन सरकारवर पुन्हा शिक्कामोर्तब झाला. अखेर झारखंड मुक्ती मोर्चाला सरकार अबाधित ठेवण्यात यश आले आहे. (Jharkhand Floor Test)
हेमंत सोरेन यांना कथित भ्रष्टाचार प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर तुरुंगात रवानगी केली. त्यांच्या जागी ‘झामुमो’चे चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर या सरकारला राज्यपालांनी सोमवारी (दि.५) बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. दरम्यान आज ४७ आमदारांच्या पाठींब्याने चंपाई सोरेन यांनी झारखंड विधानसभेत बहुमताची चाचणी पास केली. यावेळी विरोधी गटात २९ आमदार होते. त्यानंतर स्पीकर रवींद्र नाथ महतो यांच्या समोर आवाजी मतदाने विधानसभा सभागृहात मंजुर झाला. (Jharkhand Floor Test)

CM Champai Soren’s led Jharkhand government wins floor test after 47 MLAs support him
29 MLAs in opposition. #JharkhandPolitics pic.twitter.com/lviZXvCp7j
— ANI (@ANI) February 5, 2024

ED कोठडीतील ‘हेमंत सोरेन’ही फ्लोअर टेस्टमध्ये सहभागी
झारखंडमधील जमीन घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. परंतु, चंपाई सोरेन यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या बहुमत चाचणीसाठी ते उपस्थित होते.  ईडीने हेमंत सोरेन यांना राज्य विधानसभेतील बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. यानुसार, ते  सीएम चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या फ्लोअर टेस्टमध्ये सहभागी झाले होते, असे देखील वृत्त देण्यात आले आहे. (Jharkhand Floor Test)

#WATCH | Former Jharkhand CM Hemant Soren enters State Assembly in Ranchi to participate in the floor test of CM Champai Soren-led government to prove their majority. pic.twitter.com/L0tAqri0LN
— ANI (@ANI) February 5, 2024

हेही वाचा:

Jharkhand New CM: झारखंडचे नवे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…’हेमंत यांच्या कामाला गती…’
Jharkhand New CM: ‘झामुमो’ नेते चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध
Hemant Soren Resignation : बिग ब्रेकिंग! हेमंत सोरेन यांचा राजीनामा, चंपाई सोरेन होणार झारखंडचे नवे मुख्‍यमंत्री

Latest Marathi News मोठी बातमी: चंपाई सोरेन यांनी विश्वासदर्शन ठराव जिंकला Brought to You By : Bharat Live News Media.