राजुरी गावठाणात बिबट्यांचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

बेल्हे : राजुरी (ता. जुन्नर) येथील शेतशिवारात नेहमीच संचार करणारे बिबटे आता गावठाण परिसरात फिरू लागल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घरासमोर व घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे.
राजुरी, उंच खडक या गावांमधील फावडेमळा, गुरवशेत, पानसरेमळा, आबाटेक, डुंबरेमळा, आवटेमळा, गोंधळमळा, गोगडीमळा, आडेवाहाळ, सुहासनगर, सुयोगनगर, उपळीमळा, लाडूहरी मळा या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्यांचा संचार आहे. बिबट्याच्या हल्ल्यात पशुधन व पाळीव प्राणी ठार होत असल्याच्या घटना वेळोवेळी घडल्या आहेत.
हेही वाचा
टँकर पलटी झाल्यामुळे वाहतूक वळवली बाणेर मार्गे
पद कमावले आहे, कुटुंबाची सेवा करुन मिळवले नाही : जयशंकर यांचे काँग्रेसला प्रत्युत्तर
बारामती विमानतळावर नाईट लॅण्डींग : उपमुख्यमंत्री अजित पवार
Latest Marathi News राजुरी गावठाणात बिबट्यांचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण Brought to You By : Bharat Live News Media.
