सहकार पॅनलचा पाच जागांवर विजय ; समसमान मते मिळाल्यामुळे ईश्वरचिठ्ठीने निकाल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भुसावळ शेतकी संघ निवडणुकीत आजी-माजी आमदार समोरासमोर आलेले होते. या दोन्ही दिग्गज आणि त्यांचे आपापली पॅनल या निवडणुकीत उतरली होती. यामध्ये भाजपा प्रणालीत शेतकरी विकास पॅनलचा दहा जागांवर विजय झाला तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या सहकार पॅनलने पाच जागांवर विजय मिळवला. यामध्ये मिळाल्यामुळे संस्था सभासदांमध्ये दोन … The post सहकार पॅनलचा पाच जागांवर विजय ; समसमान मते मिळाल्यामुळे ईश्वरचिठ्ठीने निकाल appeared first on पुढारी.

सहकार पॅनलचा पाच जागांवर विजय ; समसमान मते मिळाल्यामुळे ईश्वरचिठ्ठीने निकाल

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
भुसावळ शेतकी संघ निवडणुकीत आजी-माजी आमदार समोरासमोर आलेले होते. या दोन्ही दिग्गज आणि त्यांचे आपापली पॅनल या निवडणुकीत उतरली होती. यामध्ये भाजपा प्रणालीत शेतकरी विकास पॅनलचा दहा जागांवर विजय झाला तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या सहकार पॅनलने पाच जागांवर विजय मिळवला. यामध्ये मिळाल्यामुळे संस्था सभासदांमध्ये दोन जागांसाठी ईश्वर चिट्ठी व्दारा निकाल काढण्यात आला.
भुसावळ शेती संघ मर्यादितच्या निवडणुकीतमध्ये आजी-माजी आमदार समोरासमोर आलेले होते या संघासाठी दि.4 रोजी 59.33% मतदान झाले. सकाळी नऊ वाजता भुसावळ येथील खाचणे हॉल येथे मतमोजणीला प्रारंभ झाला. दुपारी बारा वाजेपर्यंत संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली तर एकूण सात टेबलांवर मतमोजणी करण्यात आलेली होती.
या मतदान मोजणी प्रक्रियेत संस्था सभासद यामध्ये उमेदवारांना समसमान मते मिळाल्यामुळे ईश्वरचिठ्ठीने निकाल काढण्यात आला यावेळी श्रद्धा निलेश सोनवणे या मुलीने ईश्वर चिट्ठी काढून दोन उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले. त्यापूर्वी या मतदार संघात प्रतिनिधींचा चांगलाच गोंधळ उडाला. ईश्वरचरणी टाकण्यापूर्वीच शाब्दिक चकमक होऊ लागली मात्र निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी तत्काळ मध्यस्थी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
भाजपा प्रणित शेतकरी विकास पॅनल यांनी या निवडणुकीत 15 पैकी 11 जागावर विजय मिळवला आहे. निकाल जाहीर होताच आमदार सावकार यांचे मतमोजणी ठिकाणी आगमन झाले. विजयी कार्यकर्त्यांची हार व गुलाल टिक्का लावून त्यांचे अभिनंदन करण्यात आले कार्यकर्त्यांनी गुलालची मुक्त उधळण केली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक जगताप, सहकार अधिकारी मनोज डी. चौधरी, सहाय्यक सहकार अधिकारी एस. जी. उचित व व त्यांच्या सहकाऱ्यांनी कामकाज पाहिले.
हेही वाचा:

गुजरात अमली पदार्थ विरोधी पथकाची जळगाव जिल्ह्यात कारवाई
Jalgaon Crime | 14 वर्षीय बालिकेवर अत्याचार
जळगाव : नवीन पोलीस अधीक्षकांसमोर चोरट्यांचे आव्हान

Latest Marathi News सहकार पॅनलचा पाच जागांवर विजय ; समसमान मते मिळाल्यामुळे ईश्वरचिठ्ठीने निकाल Brought to You By : Bharat Live News Media.