माझ्या अटकेत राजभवनाचा हात : हेमंत सोरेन यांचा विधानसभेत आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंड विधानसभेत चंपाई सोरेन यांच्या सरकारच्या बहुमत चाचणीसाठी झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) चे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन विधानसभेच्या विशेष सत्राला आज (दि.५) उपस्थित राहिले. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कडक बंदोबस्तात सोरेन विधानसभेत दाखल झाले. Hemant Soren झारखंड विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या … The post माझ्या अटकेत राजभवनाचा हात : हेमंत सोरेन यांचा विधानसभेत आरोप appeared first on पुढारी.

माझ्या अटकेत राजभवनाचा हात : हेमंत सोरेन यांचा विधानसभेत आरोप

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : झारखंड विधानसभेत चंपाई सोरेन यांच्या सरकारच्या बहुमत चाचणीसाठी झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) चे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन विधानसभेच्या विशेष सत्राला आज (दि.५) उपस्थित राहिले. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कडक बंदोबस्तात सोरेन विधानसभेत दाखल झाले. Hemant Soren
झारखंड विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विधानसभेला संबोधित करताना म्हटले की, 31 जानेवारी ही काळरात्र होती. यामुळे देशाच्या लोकशाहीसाठी हा काळा दिवस म्हणून ओळखला जाईल. देशात प्रथमच एका मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. या अटकेत राजभवनचाही सहभाग होता. ज्या पद्धतीने ही घटना घडली आहे. त्याबद्दल मला खूप आश्चर्य वाटत आहे. आज मी या सभागृहात चंपाई सोरेन यांच्या विश्वासदर्शक ठरावात भाग घेत आहे. आमचा संपूर्ण पक्ष आणि आघाडी चंपाई सोरेन यांना पाठिंबा देत आहे.”Hemant Soren
Hemant Soren : झारखंड विधानसभेचे संख्याबळ
झारखंड विधानसभेत एकूण 81 सदस्य आहेत. यातील एक जागा सध्या रिक्त आहे. एका आमदाराने आजारपणामुळे फ्लोअर टेस्टला हजेरी लावली नाही. विधानसभेत 79 आमदार असून बहुमताचा आकडा 40 झाला आहे. सत्ताधारी आघाडीत एकूण 48 आमदार आहेत. ज्यात JMM चे 29, काँग्रेसचे 17, RJD चा एक, CPI (ML) चा एक आमदार आहे. भाजपचे 26, AJSU चे 3, NCP (AP) चे एक आणि दोन अपक्ष आमदार आहेत. तर विरोधी आमदारांचा एकूण आकडा 32 आहे.

#WATCH रांची: झारखंड के मुख्यमंत्री चम्पाई सोरेन के फ्लोर टेस्ट के दौरान झारखंड के पूर्व मुख्यमंत्री हेमंत सोरेन ने कहा, “मैं आज इस सदन में चम्पाई सोरेन के विश्वास मत का हिस्सा बन रहा हूं। हमारी पूरी पार्टी और गठबंधन दल चम्पाई सोरेन को समर्थन करता है।” pic.twitter.com/uSdfscGD2y
— ANI_HindiNews (@AHindinews) February 5, 2024

हेही वाचा 

Hemant Soren Arrest : हेमंत सोरेन अटक प्रकरणी झारखंड उच्‍च न्‍यायालयाची ‘ईडी’ला नोटीस
Mamata Banerjee On Hemant Soren : हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया; म्हणाल्या…’षडयंत्राची पुनरावृत्ती’
Jharkhand New CM: झारखंडचे नवे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…’हेमंत यांच्या कामाला गती…’

Latest Marathi News माझ्या अटकेत राजभवनाचा हात : हेमंत सोरेन यांचा विधानसभेत आरोप Brought to You By : Bharat Live News Media.