नेतेगिरी आवरेना ! दशक्रिया विधीतही भाषणांचा अतिरेक

ओतूर : पुढारी वृत्तसेवा :  तसे पाहिले तर दशक्रिया विधी हा सोळा संस्कारांपैकी शेवटचा विधी आहे. दशक्रिया विधी हा केवळ धार्मिकच विधी नसून तो भावनिक विधी आहे. दशक्रिया विधीमध्ये खरे महत्त्व पिंडदान करण्याला असते. पण, आता हा पवित्र विधी पार पडत असताना एकामागून एक श्रद्धांजलीपर भाषणे हा प्रकार विशेषतः ग्रामीण भागात सगळीकडेच पाहायला मिळत आहे. … The post नेतेगिरी आवरेना ! दशक्रिया विधीतही भाषणांचा अतिरेक appeared first on पुढारी.

नेतेगिरी आवरेना ! दशक्रिया विधीतही भाषणांचा अतिरेक

ओतूर : Bharat Live News Media वृत्तसेवा :  तसे पाहिले तर दशक्रिया विधी हा सोळा संस्कारांपैकी शेवटचा विधी आहे. दशक्रिया विधी हा केवळ धार्मिकच विधी नसून तो भावनिक विधी आहे. दशक्रिया विधीमध्ये खरे महत्त्व पिंडदान करण्याला असते. पण, आता हा पवित्र विधी पार पडत असताना एकामागून एक श्रद्धांजलीपर भाषणे हा प्रकार विशेषतः ग्रामीण भागात सगळीकडेच पाहायला मिळत आहे. देवाघरी गेलेल्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहणे गैर नाही. पण, त्याचा अलीकडच्या काळात अतिरेक होऊ लागल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे.
बहुतांश गावांमध्ये श्रद्धांजलीची भाषणे करण्यासाठी तर अक्षरशः रांग लागलेली असते. राजकीय लोक आणि नेते इथे ती संधी सोडताना दिसत नाहीत.
खरेतर दहाव्याचा विधी चालू असताना प्रवचन व पसायदान तसेच श्रद्धांजलीसाठी आणि देवाघरी गेलेल्या व्यक्तीच्या आदर्श जीवनातील महत्त्वाचे मार्गदर्शी प्रसंग समाजाला कथन करण्यासाठी एका महत्त्वाच्या प्रमुख व्यक्तीचे भाषण हे पुरेसे आहे, तसेच निवेदकाने केवळ उपस्थितांचा नामोल्लेख करणे गरजेचे असताना हल्ली श्रध्दांजलीपर भाषणांचा अतिरेक वाढता आहे. देवाघरी गेलेल्या व्यक्तीच्या परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी व कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी त्या परिवाराचे सर्व नातेवाईक दूर-दूरवरून दशक्रिया विधीला हजेरी लावतात. त्यांना पुन्हा प्रवास करून वेळेत घरी पोहचायचे असते.
काही शहरी नोकरदार पाहुण्यांना कामावर हजर व्हायचे असते तर व्यवसाय बंद ठेवून आलेल्या पाहुण्यांनाही वेळेवर इच्छितस्थळी जाण्याची घाई असते. दररोज कुणाचा ना कुणाचा विधी पार पडत असतोच. परिणामी, बहुतांश लोकांची दैनंदिन दिवसाची सुरुवात ही दशक्रिया विधीला हजेरी लावण्यापासून होत असते. त्यामुळे आटोपशीर महत्त्वाचा पिंडदान विधी आणि कुटुंबाची आर्थिक सांत्वनपर प्रत्यक्ष भेट महत्त्वाची मानून श्रद्धांजलीपर भाषणांना फाटा देत उपस्थितांच्या वेळेचा अपव्यय टाळावा, अशी सर्वसामान्य जनतेतून मागणी होत आहे.
Latest Marathi News नेतेगिरी आवरेना ! दशक्रिया विधीतही भाषणांचा अतिरेक Brought to You By : Bharat Live News Media.