वळती येथे तुर्की बाजरी आली फुलोर्‍यात दीड-दोन फुटांची कणसे ठरताहेत लक्षवेधी

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  सोशल मीडियावर विविध पिकांचे प्रयोग पाहून आता ग्रामीण भागातील शेतकरी हायटेक झाले आहेत. वळती (ता. आंबेगाव) येथील भाऊ भिका भोर या शेतकर्‍याने तुर्की वाणाच्या बाजरीचे पीक घेऊन यशस्वी प्रयोग केला आहे. या बाजरीच्या पिकाची कणसे फुलोर्‍यात आली असून, त्यांची लांबी दीड ते दोन फूट असल्याने ती लक्ष वेधून घेत आहेत. … The post वळती येथे तुर्की बाजरी आली फुलोर्‍यात दीड-दोन फुटांची कणसे ठरताहेत लक्षवेधी appeared first on पुढारी.

वळती येथे तुर्की बाजरी आली फुलोर्‍यात दीड-दोन फुटांची कणसे ठरताहेत लक्षवेधी

पारगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा :  सोशल मीडियावर विविध पिकांचे प्रयोग पाहून आता ग्रामीण भागातील शेतकरी हायटेक झाले आहेत. वळती (ता. आंबेगाव) येथील भाऊ भिका भोर या शेतकर्‍याने तुर्की वाणाच्या बाजरीचे पीक घेऊन यशस्वी प्रयोग केला आहे. या बाजरीच्या पिकाची कणसे फुलोर्‍यात आली असून, त्यांची लांबी दीड ते दोन फूट असल्याने ती लक्ष वेधून घेत आहेत.
ग्रामीण भागातील शेतकरी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या शेतात विविध आधुनिक प्रयोग करत आहेत. त्यामध्ये ते यशस्वीदेखील होत आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बाजरीचे पीक उन्हाळी व पावसाळी या दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. बाजरीला कमी पाणी असले तरी चालते. स्वच्छ हवामानाची साथ मिळाली तर भरघोस उत्पादन मिळते. बाजरीला दिवसेंदिवस बाजारभावदेखील चांगले मिळत असल्याने शेतकर्‍यांना बाजरी पिकातून चांगले अर्थाजन होताना दिसत आहे. वळती येथील शेतकरी भाऊ भोर यांनी सोशल मीडियावर तुर्की बाजरीच्या बियाण्याविषयी माहिती पाहिली. त्यानंतर त्यांनी तुर्कस्तान येथून तुर्की बाजरीच्या वाणाचे बाराशे रुपये किलो दराने ऑनलाइन बियाणे मागवून घेतले. त्याची शेतात पेरणी केली. त्यांनी घेतलेले बाजारचे पीक आता फुलोर्‍यात आले आहे. या वाणाच्या बाजरीला आलेली दीड ते फुटापर्यंतची कणसे लक्ष वेधून घेत आहेत. एकरी 30 ते 35 पोती बाजरीचे उत्पादन मिळेल, असा अंदाज शेतकरी भोर यांनी व्यक्त केला आहे.
Latest Marathi News वळती येथे तुर्की बाजरी आली फुलोर्‍यात दीड-दोन फुटांची कणसे ठरताहेत लक्षवेधी Brought to You By : Bharat Live News Media.