उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाची सहमती

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिंदे गटाच्या आमदारांविरोधातील अपात्रतेची याचिका फेटाळण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी या खटल्याची लवकर सुनावणी घ्यावी, अन्यथा निवडणुका होतील असा उल्लेख केला होता. यावर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील … The post उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाची सहमती appeared first on पुढारी.

उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाची सहमती

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : शिंदे गटाच्या आमदारांविरोधातील अपात्रतेची याचिका फेटाळण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे.
ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी या खटल्याची लवकर सुनावणी घ्यावी, अन्यथा निवडणुका होतील असा उल्लेख केला होता. यावर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणी घेण्याबाबत सहमती दर्शवल्याचे सिब्बल यांनी म्हटले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिला होता. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटातील आमदारांना पात्र ठरवले तसेच खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली. नार्वेकरांच्या या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे.
Latest Marathi News उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाची सहमती Brought to You By : Bharat Live News Media.