शेअर्स खरेदी करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची साडेतेवीस लाखांची फसवणूक

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : शेअर्स खरेदी करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची 23 लाख 40 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 4 डिसेंबर 2023 ते 29 जानेवारी 2024 या कालावधीत संभाजीनगर, चिंचवड येथे घडली. संतोष एकनाथ गायकवाड (47, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोबाईल धारक आणि बँकेचे अनोळखी खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपली pantheon ventures llp ltd या नावाची कंपनी असून कंपनीच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, अशा प्रकारची जाहिरात केली होती. फिर्यादी गायकवाड यांनी जाहिरात पाहून आरोपींशी संपर्क केला. दरम्यान, आरोपींनी गायकवाड यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडले. पैसे कमावण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी शेअर्स खरेदी करण्यासाठी गायकवाड यांच्याकडून आरोपींनी 24 लाख रुपये घेतले. दरम्यान, आरोपींनी गायकवाड यांना 60 हजार रुपये परत दिले. उर्वरित 23 लाख 40 हजार रुपये परत न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हेही वाचा
Pimpri : प्राधिकरणातील हेगडेवार भवनाशेजारीही अग्निशमन केंद्र
फोपसंडीतील रांजणखळग्यांचे पर्यटकांना आकर्षण
Nashik Crime News : टेरर फंडिंगमधील संशयित आज पुन्हा न्यायालयात
Latest Marathi News शेअर्स खरेदी करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची साडेतेवीस लाखांची फसवणूक Brought to You By : Bharat Live News Media.
