पहिलवान कैलास पवार हत्या प्रकरण : दोघांना अटक; एक फरार

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  मांजरवाडीत पहिलवान कैलास पवार याचा खून केल्याच्या संशयावरून सुनील मारुती पवार, अनिल ऊर्फ मंगल मारुती पवार आणि प्रवीण मारुती पवार (रा. केंदूर, ता. शिरूर) या तीन भावांवर नारायणगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील अनिल आणि प्रवीण मारुती पवार या दोन भावांना अटक केली असून, सुनील मारुती पवार हा … The post पहिलवान कैलास पवार हत्या प्रकरण : दोघांना अटक; एक फरार appeared first on पुढारी.

पहिलवान कैलास पवार हत्या प्रकरण : दोघांना अटक; एक फरार

नारायणगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा :  मांजरवाडीत पहिलवान कैलास पवार याचा खून केल्याच्या संशयावरून सुनील मारुती पवार, अनिल ऊर्फ मंगल मारुती पवार आणि प्रवीण मारुती पवार (रा. केंदूर, ता. शिरूर) या तीन भावांवर नारायणगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील अनिल आणि प्रवीण मारुती पवार या दोन भावांना अटक केली असून, सुनील मारुती पवार हा तिसरा आरोपी मात्र फरार झाला. जुन्या भांडणातून कैलास व त्यांच्यात वाद झाला होता व या वादातून ही घटना घडल्याचे समोर आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
मांजरवाडी येथे शनिवारी (दि. 3) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा अंत्यविधी झाला. त्यासाठी कैलास पवार हा नातेवाइकांसह उपस्थित होता. अंत्यविधी झाल्यानंतर कैलास पवार व आरोपी हे मांजरवाडी येथील हॉटेलमध्ये व येथील रस्त्यालगत असलेल्या मंदिरासमोरील झाडाजवळ चर्चा करीत होते. या वेळी आरोपींनी कैलास याच्या छाती, पाठ व खांद्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या गुन्ह्यातील सुनील मारुती पवार हा मुख्य आरोपी फरार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी सांगितले. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना 5 दिवसांची म्हणजे 9 फेब—ुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. फरारी आरोपीचा पोलिस शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
Latest Marathi News पहिलवान कैलास पवार हत्या प्रकरण : दोघांना अटक; एक फरार Brought to You By : Bharat Live News Media.