Crime News : सांगवीतून टेम्पो चोरीला

सांगवी : पुढारी वृत्तसेवा :  सांगवी (ता. बारामती) येथील डेअरीसमोर लावलेला पिकअप टेम्पो (एमएच 11 एजी 2194) चोरीला गेला. ही घटना रविवारी (दि.4) पहाटे उघडकीस आली. टेम्पो चोरणारे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. सांगवी ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत तावरे यांचा डेअरी व्यवसाय आहे. शनिवारी रात्री दुधाचे सुमारे 14 कॅनसहित टेम्पो त्यांच्या डेअरीसमोर लावला होता. चोरट्यांनी मध्यरात्री … The post Crime News : सांगवीतून टेम्पो चोरीला appeared first on पुढारी.

Crime News : सांगवीतून टेम्पो चोरीला

सांगवी : Bharat Live News Media वृत्तसेवा :  सांगवी (ता. बारामती) येथील डेअरीसमोर लावलेला पिकअप टेम्पो (एमएच 11 एजी 2194) चोरीला गेला. ही घटना रविवारी (दि.4) पहाटे उघडकीस आली. टेम्पो चोरणारे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. सांगवी ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत तावरे यांचा डेअरी व्यवसाय आहे. शनिवारी रात्री दुधाचे सुमारे 14 कॅनसहित टेम्पो त्यांच्या डेअरीसमोर लावला होता. चोरट्यांनी मध्यरात्री कॅनसहित टेम्पो चोरून नेला. दुधाचे मोकळे झालेले 14 कॅन सांगवी-पणदरे रस्त्यावरील चारीशेजारील शेतात फेकून दिले होते. रविवारी पहाटे साडेपाच वाजता दैनिक Bharat Live News Mediaचे पत्रकार अनिल तावरे हे व्यायामाला जात असताना त्यांना अस्ताव्यस्त पडलेले दुधाचे कॅन दिसले. त्यांनी दूध संघाचे माजी अध्यक्ष प्रकाशराव तावरे, वरुण तावरे व सरपंच चंद्रकांत तावरे यांच्याशी संपर्क साधला. तसेच माळेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांना माहिती दिली.
या चोरीची फिर्याद आकाश चंद्रकांत तावरे यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात दिली. डेअरी येथील सीसीटीव्हीची तपासणी केली असता चार चाकीतून आलेल्या चार चोरट्यांपैकी एक स्पष्टपणे दिसत आहे. मिळालेल्या फुटेजवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तपास हवालदार संजय मोहिते करीत आहेत.
Latest Marathi News Crime News : सांगवीतून टेम्पो चोरीला Brought to You By : Bharat Live News Media.