महेश गायकवाड यांचा उपचारांना प्रतिसाद; श्रीकांत शिंदेंनी घेतली भेट

नेवाळी (ठाणे); Bharat Live News Media वृत्तसेवा : शिवसेनेचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. या गोळीबारात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्याकडून उपचारांना योग्य प्रतिसाद दिला जात असून तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी सकाळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
जमिनीच्या वादातून अंबरनाथ तालुक्यातील रक्तरंजीत राडा थेट हिललाईन पोलीस ठाण्यात दिसून आला आहे. तीन दिवसांपासून पेटत असलेल्या प्रकरणाने रौद्र रूप धारण करत एकमेकांच्या जिवावर उठल्याचे समोर आले आहे. भाजप आमदाराने शिवसेनेच्या शहर प्रमुखासह अन्य सहकारी राहुल पाटील आणि चैनू जाधव यांच्या दिशेने गोळीबार केला होता. या गोळीबारात राहुल पाटील आणि महेश गायकवाड हे जखमी झाले. सध्या पाटील यांची प्रकृती स्थिर असली तरी महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक होती. सोमवारी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे महेश गायकवाड यांची भेट घेतली असून त्यांच्या तब्बेतीमध्ये सुधारणा होत असल्याचे शिंदे यांनी माध्यमांना सांगितले.
Latest Marathi News महेश गायकवाड यांचा उपचारांना प्रतिसाद; श्रीकांत शिंदेंनी घेतली भेट Brought to You By : Bharat Live News Media.
