Market : पुण्यात फळभाज्यांची आवक वाढली

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (दि. 4) फळभाज्यांची आवक गत आठवड्याच्या तुलनेत दहा ट्रकने वाढली. राज्यासह परराज्यातून 100 ट्रक शेतमाल बाजारात विक्रीसाठी दाखल झाला. मार्केट यार्डात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी राहिल्याने टोमॅटो, ढोबळी मिरची आणि शेवगा वगळता अन्य सर्व फळभाज्यांच्या भावात पाच ते दहा टक्क्यांनी … The post Market : पुण्यात फळभाज्यांची आवक वाढली appeared first on पुढारी.

Market : पुण्यात फळभाज्यांची आवक वाढली

शंकर कवडे

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (दि. 4) फळभाज्यांची आवक गत आठवड्याच्या तुलनेत दहा ट्रकने वाढली. राज्यासह परराज्यातून 100 ट्रक शेतमाल बाजारात विक्रीसाठी दाखल झाला. मार्केट यार्डात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी राहिल्याने टोमॅटो, ढोबळी मिरची आणि शेवगा वगळता अन्य सर्व फळभाज्यांच्या भावात पाच ते दहा टक्क्यांनी घसरण झाली.
टोमॅटोची आवक रोडावल्याने त्याच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. थंडीमुळे ढोबळी मिरचीच्या उत्पादनात घट झाली आहे. याखेरीज, राज्यासह परराज्यातून शेवग्याचीही आवक घटल्याने या फळभाज्यांच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व फळभाज्यांची आवक जावक कायम असल्याने गत आठवड्यातील दर टिकून आहेत, अशी माहिती मार्केट यार्डातील जेष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली. परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 8 ते 10 टेम्पो, कर्नाटक, कर्नाटकातून येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 11 ते 12 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो, मध्य प्रदेश व राजस्थान येथून 15 ते 16 ट्रक मटार, कर्नाटक येथून 2 ते 3 टेम्पो पावटा, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे 6 टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 600 ते 700 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 2 ते 3 टेम्पो, टोमॅटो सुमारे 8 ते 9 हजार क्रेट, हिरवी मिरची 5 ते 6 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, सिमला मिरची 8 ते 10 टेम्पो, पावटा 4 ते 5 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, शेवगा 2 टेम्पो, घेवडा 5 ते 6 टेम्पो, कांदा सुमारे 100 ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 50 टेम्पो इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केटयार्ड येथील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
हेही वाचा

जळगाव : एम राजकुमार यांनी स्विकारला जळगाव पोलीस अधिक्षकपदाचा पदभार
केशवनगर परिसरामध्ये रस्त्याचे काम संथगतीने; नागरिक व वाहनचालक त्रस्त
अभूतपूर्व तेजीच्या शक्यतेवर अर्थसंकल्पाचे शिक्कामोर्तब

Latest Marathi News Market : पुण्यात फळभाज्यांची आवक वाढली Brought to You By : Bharat Live News Media.