अभूतपूर्व तेजीच्या शक्यतेवर अर्थसंकल्पाचे शिक्कामोर्तब

या वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीमध्ये आरबीआय अर्धा टक्का व्याजदर कमी करेल, असा विश्वास जेफरीजने व्यक्त केला आहे. एप्रिलमध्ये कंपन्यांचे वार्षिक आर्थिक निकाल येण्यास सुरुवात होईल. त्यांच्या निकालामध्ये जर चांगली Earnings Growth दिसली तर 2024 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी अभूतपूर्व ठरेल. अर्थसंकल्प मग तो देशाचा असो, राज्याचा असो, एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचा असो की आपल्या स्वतःच्या घराचा. … The post अभूतपूर्व तेजीच्या शक्यतेवर अर्थसंकल्पाचे शिक्कामोर्तब appeared first on पुढारी.

अभूतपूर्व तेजीच्या शक्यतेवर अर्थसंकल्पाचे शिक्कामोर्तब

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा.लि.

या वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीमध्ये आरबीआय अर्धा टक्का व्याजदर कमी करेल, असा विश्वास जेफरीजने व्यक्त केला आहे. एप्रिलमध्ये कंपन्यांचे वार्षिक आर्थिक निकाल येण्यास सुरुवात होईल. त्यांच्या निकालामध्ये जर चांगली Earnings Growth दिसली तर 2024 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी अभूतपूर्व ठरेल.
अर्थसंकल्प मग तो देशाचा असो, राज्याचा असो, एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचा असो की आपल्या स्वतःच्या घराचा. त्याबाबत सर्वांची एक सर्वसाधारण समजूत अशी असते की, अर्थसंकल्प म्हणजे उत्पन्न असे येणार, खर्च असा होणार. उत्पन्न खर्चापेक्षा अधिक असेल (प्रस्तावित) तर अंतिमतः शिल्लक राहील किंवा उत्पन्नापेक्षा खर्च अधिक दिसत असेल तर तो तुटीचा अर्थसंकल्प होईल. आता हे झाले अर्थसंकल्पाचे ढोबळ स्वरूप. परंतु, अर्थसंकल्प आणि तोही देशाचा याद़ृष्टीने अनन्यसाधारण महत्त्वाचा असतो की, त्यातून सरकारची नीतिमूल्ये, दिशा आणि जनतेच्या सरकारकडून अपेक्षा प्रतिबिंबित होतात.
परवाचा अर्थसंकल्प हा येणार्‍या लोकसभा निवडणुकाुंमुळे अंतरिम अर्थसंकल्प होता आणि त्यामुळे तो मर्यादित तरतुदींचा असणार, हे सर्वांनी आधीच गृहीत धरले होते. परंतु, तोंडावर निवडणुका असूनही कोणत्याही सवंग घोषणांचा अर्थमंत्र्यांनी आधार घेतला नाही. GDP च्या 5.3 टक्के वित्तीय तूट बाजाराने अपेक्षित धरली असताना अर्थमंत्र्यांनी 5.1 टक्के तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आणि तोही Capital Expenditure (भांडवली खर्च) मध्ये कोणतीही तडजोड न करता. उलट भांडवली खर्चात 16 टक्के वाढ करून तो रु.11.11 लाख कोटींवर नेवून सरकारने आपण पायाभूत विकासाच्या मार्गावर निर्धाराने चालणार असल्याचे दाखवून दिले.
या तीन सकारात्मक गोष्टीचे प्रतिबिंब बाजारात दुसर्‍या दिवशी उमटले आणि अर्थसंकल्पाच्या दिवशी सपाट राहिलेल्या बाजारात दुसर्‍या दिवशी जोरदार उसळी आली. गेले दोन आठवडे 21200 ते 21900 या पट्ट्यात अडकलेल्या निफ्टीने 22000 चा टप्पा पार करून 22126.80 हा नवीन उच्चांक प्रस्थापित केला. बाँड यील्डसमध्ये मोठी घसरण झाल्यामुळे सरकारी बँकांच्या शेअर्सनी उत्सव साजरा केला. विशेषतः पीएनबी बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक या शेअर्सनी 20 टक्क्यांपर्यंत तेजी दाखवली.
इथून पुढे म्हणजे 2024 मध्ये भारतीय बाजाराची वाटचाल कशी राहील?
अर्थमंत्र्यांच्या या वित्तीय शिस्तीला आरबीआयने व्याज दर कमी करून दाद दिली तर बाजाराच्या द़ृष्टीने सोने पे सुहागा होईल. या वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीमध्ये आरबीआय अर्धा टक्का व्याजदर कमी करेल, असा विश्वास जेफरीजने व्यक्त केला आहे. एप्रिलमध्ये कंपन्यांचे वार्षिक आर्थिक निकाल येण्यास सुरुवात होईल. त्यांच्या निकालामध्ये जर चांगली Earnings Growth दिसली तर 2024 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी अभूतपूर्व ठरेल. शुक्रवारच्या बाजाराने याची चुणूक दाखवली आहे.
सौरऊर्जा, अक्वाकल्चर, हाऊसिंग, फायनान्स, सरकारी बँका यांचे शेअर्स इथून पुढे सर्वात मोठे लाभार्थी ठरतील. जेफरीजने आपल्या यादीत टाटा मोटर्स, अशोक लेलँड, होम फर्स्ट, आवास, सिमेन्स इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एल अ‍ॅड टी, पॉवर ग्रीड, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू एनर्जी, डीक्सन टेक आणि अंबेर या कंपन्यांच्या अर्थसंकल्पाचे लाभार्थी म्हणून समावेश केला आहे. आरबीआयने व्याजदर कमी केले तर रिअल इस्टेट, ऑटो सेक्टर, सरकारी बँका, लहान खासगी बँका यांचे शेअर्स वाढतील.
पायाभूत विकासाच्या धोरणामुळे कॅपिटल गुडस, सिमेंट, ट्रॅव्हल या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येईल, असे एचएसबीसीचे म्हणणे आहे. एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, इंडियन हॉटेल्स, जीएमआर इन्फ्रा हे शेअर्स नेत्रदीपक प्रगती करतील. इंडियन हॉटेल्सने आपले दमदार आर्थिक निकाल नुकतेच सादर केले आहेत. शुक्रवारी या शेअरने 500 चा टप्पा पार केला. (रु. 501.25) या आर्थिक वर्षात तो 1000 पर्यंत जाईल, असे त्याच्या वाटचालीवरून वाटते. देशातील विमानतळांचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा निर्धार सरकारने व्यक्त केला आहे. जीएमआर इन्फ्रा ही कंपनी या धोरणाची सर्वात मोठी लाभार्थी ठरणार आहे. रु. 85 वर असणारा हा शेअर याच महिन्यात शतक ठोकेल. दहा टक्के वाढ या वर्षात गृहीत धरली तरी निफ्टी 24000 आणि सेन्सेक्स 80000 च्या पुढे जाईल. कंपन्यांची Earnings Growth आरबीआयचा व्याजदर कमी करण्याचा पवित्रा आणि लोकसभेचे निकाल या तीन गोष्टींनी बाजाराला सकारात्मक साथ दिली तर निफ्टी 25000 आणि सेन्सेक्स 1,00,000 हे गुलाबी चित्र याच वर्षात रंगवले जाईल.
Latest Marathi News अभूतपूर्व तेजीच्या शक्यतेवर अर्थसंकल्पाचे शिक्कामोर्तब Brought to You By : Bharat Live News Media.