शेअर बाजाराची ‘सावध’ सुरुवात, सेन्सेक्स ७२२०० च्या पातळीवर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारातून मिळालेल्‍या संमिश्र संकेतांमुळे आज (दि.५) आठवड्याच्‍या पहिल्‍या दिवशी शेअर बाजारातील व्‍यवहारांना सावध सुरुवात झाली. सेन्सेक्स 72000 आणि निफ्टी 21800 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. याआधी शुक्रवार, २ फेब्रुवारी राजी सेन्सेक्स 440 अंकांनी वाढून 72,085 वर बंद झाला होता. बॅकिंग क्षेत्रातील शेअर्सची विक्री, पेटीएमची घसरण सुरुच बाजाराची सुस्‍त वाटचाल सुरु … The post शेअर बाजाराची ‘सावध’ सुरुवात, सेन्सेक्स ७२२०० च्या पातळीवर appeared first on पुढारी.
शेअर बाजाराची ‘सावध’ सुरुवात, सेन्सेक्स ७२२०० च्या पातळीवर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारातून मिळालेल्‍या संमिश्र संकेतांमुळे आज (दि.५) आठवड्याच्‍या पहिल्‍या दिवशी शेअर बाजारातील व्‍यवहारांना सावध सुरुवात झाली. सेन्सेक्स 72000 आणि निफ्टी 21800 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. याआधी शुक्रवार, २ फेब्रुवारी राजी सेन्सेक्स 440 अंकांनी वाढून 72,085 वर बंद झाला होता.
बॅकिंग क्षेत्रातील शेअर्सची विक्री, पेटीएमची घसरण सुरुच
बाजाराची सुस्‍त वाटचाल सुरु असताना टाटा मोटर्सचा चांगला परिणाम दिसून येत आहे. तर बँकिंग क्षेत्रात विक्री होत आहे. SBI सर्वाधिक तोट्यात आहे. पेटीएमचे शेअर्स आजही घसरले आहेत. दरम्‍यान. डॉलरच्या तुलनेत रुपया 12 पैशांनी कमजोर झाला आहे.
बेंचमार्क इक्विटी निर्देशांकांनी सोमवारचे ट्रेडिंग सत्र सकारात्मक क्षेत्रात उघडले. NSE निफ्टी 50 67.25 अंकांनी किंवा 0.31% ने वाढून 21,921.05 वर स्थिरावला, तर BSE सेन्सेक्स 183,48 अंकांनी किंवा 0.25% ने वाढून 72,269.12 वर उघडला. विस्तृत निर्देशांक मिश्र प्रदेशात उघडले. बँक निफ्टी निर्देशांक फक्त 8.70 अंकांनी किंवा 0.02 टक्क्यांनी घसरून 45,962.25 वर स्थिरावला.
‘या’ कंपनींचे शेअर्स आघाडीवर
निफ्टी ५० मध्ये टाटा मोटर्स, सन फार्मा, आयशर मोटर्स, सिला, आणि एमअँडएम कंपनीचे शेअर्स आघाडीवर आहेत. तर यूपीएल, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, कोटक बँक आणि रिलायन्स हे निफ्टी ५० मधील प्रमुख घसरले.
 
Latest Marathi News शेअर बाजाराची ‘सावध’ सुरुवात, सेन्सेक्स ७२२०० च्या पातळीवर Brought to You By : Bharat Live News Media.