समुद्रातील झुल्यावरून तिचा पाय घसरला अन्!

बर्लिन : सोशल मीडियावर एकापेक्षा एक अफलातून व्हिडीओ पहायला मिळतात. रील्सची दुनिया तर निव्वळ भन्नाट झाली आहे. रील्स, व्हिडीओच्या या आभासी जगतात कसा वेळ निघून जातो, हे कळतही नाही. मात्र, काही व्हिडीओ हे निव्वळ भन्नाट असतात आणि ते स्तिमितही करून टाकतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून यात व्हिडीओ करताना एका युवतीचा पाय समुद्रातील … The post समुद्रातील झुल्यावरून तिचा पाय घसरला अन्! appeared first on पुढारी.

समुद्रातील झुल्यावरून तिचा पाय घसरला अन्!

बर्लिन : सोशल मीडियावर एकापेक्षा एक अफलातून व्हिडीओ पहायला मिळतात. रील्सची दुनिया तर निव्वळ भन्नाट झाली आहे. रील्स, व्हिडीओच्या या आभासी जगतात कसा वेळ निघून जातो, हे कळतही नाही. मात्र, काही व्हिडीओ हे निव्वळ भन्नाट असतात आणि ते स्तिमितही करून टाकतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून यात व्हिडीओ करताना एका युवतीचा पाय समुद्रातील झोक्यावरून कसा घसरला तर त्याचे लाईव्ह रेकॉर्डिंग झाले आणि पाहता पाहता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक युवती समुद्रात झुल्यावर डान्स करताना दिसत आहे. समुद्रात खोलवर बांधलेल्या झुल्यावर ही युवती हा व्हिडीओ व्हायरल होत असून मालदीवचा असल्याचे बोलले जात आहे. निळ्या आणि पांढर्‍या कपड्यांमध्ये या युवतीने नृत्य सुरू केले.
प्रारंभी तिला उत्तम लय सापडली, पण अचानक तिचा तोल गेला आणि ती समुद्रात पडली. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सही क्षणभर हैराण झाले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत 75 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तरुणीच्या व्हायरल व्हिडीओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिले की, ‘ती काहीतरी वेगळे करण्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट घेत आहे,’ . दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘सेल्फ मेड हिरोईन.’ आणखी एका युजरने ‘पडण्याची पद्धत थोडी कॅज्युअल आहे’, असे निरीक्षण नोंदवले.
Latest Marathi News समुद्रातील झुल्यावरून तिचा पाय घसरला अन्! Brought to You By : Bharat Live News Media.