समान नागरी कायद्याला उत्तराखंड कॅबिनेटची मंजुरी!

डेहराडून : उत्तराखंड राज्य सरकारच्या कॅबिनेटने समान नागरी कायद्याला मंजुरी दिली. आगामी काळात होणार्या विधानसभेच्या अधिवेशनात हे विधेयक सभागृहात मांडले जाईल. लवकरच उत्तराखंड राज्यात समान नागरी कायदा लागू होईल. उत्तराखंड हे असा कायदा लागू करणारे गोव्यानंतरचे पहिलेच राज्य ठरेल.
उत्तराखंड सरकारने समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या (रंजना प्रकाश देसाई) अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने मसुद्याचा अहवाल मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांना सादर केला आणि लगोलग समान नागरी कायदा लागू करण्याची घोषणा केली.
घटस्फोट, विवाह, मूल दत्तक घेणे आणि मालमत्तेची वाटणी अशा विषयांमध्ये सर्व नागरिकांसाठी एकच कायदा असेल. वारसा हक्क, कौटुंबिक संपत्तीची वाटणी, लग्नाचे वय, घटस्फोट आदी बाबींत प्रत्येक नागरिकासाठी समान नियम असतील.
Latest Marathi News समान नागरी कायद्याला उत्तराखंड कॅबिनेटची मंजुरी! Brought to You By : Bharat Live News Media.
