मुंबई : मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अजहरी यांना अटक; घाटकोपरमध्ये तणाव

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती मोहम्मद सलमान अझरी (Mufti Salman Azhari) यांना आज (दि ४) गुजरात पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले. त्यानंतर गुजरात पोलिसांनी त्यांना घाटकोपर पोलीस ठाण्यात आणले. यामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. ३१ जानेवारी रोजी जुनागड गुजरातला मुफ्ती सलमान अझरी यांनी एक भाषण केले होते. यात आज … The post मुंबई : मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अजहरी यांना अटक; घाटकोपरमध्ये तणाव appeared first on पुढारी.

मुंबई : मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अजहरी यांना अटक; घाटकोपरमध्ये तणाव

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती मोहम्मद सलमान अझरी (Mufti Salman Azhari) यांना आज (दि ४) गुजरात पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले. त्यानंतर गुजरात पोलिसांनी त्यांना घाटकोपर पोलीस ठाण्यात आणले. यामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
३१ जानेवारी रोजी जुनागड गुजरातला मुफ्ती सलमान अझरी यांनी एक भाषण केले होते. यात आज कुत्तओ का दौर है, कल हमारा आयेगा असे भाषण केले होते. यावरुन हिंदुत्ववादींनी सोशल मीडियावर जोरदार टीका केली होती. तर गुजरात पोलोसांनी या बाबत गुन्हा दाखल केला होता. मुफ्ती सलमान हे मुस्लिम धर्मगुरु आहेत. त्यांची धार्मिक भाषणे समाजमाध्यमात प्रचंड व्हायरल होत असतात. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने गुजरात पोलीस हे त्यांना ताब्यात घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले. घाटकोपरच्या सागर पार्क येथील त्यांच्या घरून मुंबई पोलिसांच्या मदतीने गुजरात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि पुढील प्रक्रियेसाठी त्यांना घाटकोपर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मात्र याची माहिती मिळताच शेकडोच्या संख्येने त्यांचे अनुयायी घाटकोपर
पोलीस ठाण्याच्या समोर जमा झाले. ही अटक प्रक्रिया चुकीची आहे, आम्ही मुफ्तींना जाऊ देणार नाही अशी भूमिका या जमावाने घेत घोषणाबाजी देखील केली. वातावरण आणखी तणावपूर्ण झाल्याने अखेर पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या खिडकीतून मुफ्ती सलमान यांना जमवाला शांत रहाण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती केली. मुफ्ती सलमान यांनी पोलीस ठाण्याच्या खिडकीतून जमावाला शांत राहण्याचे आवाहन केल्याने जमाव शांत झाला. या दरम्यान दंगल नियंत्रक पथक, राज्य राखीव पोलीस दल आणि मोठ्या प्रमाणात सर्व पोलीस ठाण्यातून पोलीस अधिकारी आणि पथके घाटकोपर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. रात्री उशिरा पर्यंत कोणताही निर्णय होत नसल्याने स्थिती तणावाची झाली होती.

#WATCH | Mumbai: Wahid Sheikh, lawyer of Maulana Mufti Salman Azhari who was detained in a hate speech case, says, “35-40 policemen in civil dress were present at Maulana Mufti Salman Azhari’s house in the morning hours. We asked them about their purpose for coming, but nothing… pic.twitter.com/JO3OIhJVSI
— ANI (@ANI) February 4, 2024

हेही वाचा

Kunal Raut : पंतप्रधानांच्या फोटोला काळे फासल्याप्रकरणी कुणाल राऊत यांना अटक
Eknath Shinde: साहित्यिकांना राजकीय कादंबरी लिहिण्यासाठी आजचे वातावरण पोषक : मुख्यमंत्री
Jitendra Awhad On Ajit Pawar : “तुमच्या इतका कृतघ्न…”; जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर बोचरी टीका

Latest Marathi News मुंबई : मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अजहरी यांना अटक; घाटकोपरमध्ये तणाव Brought to You By : Bharat Live News Media.