बीड : माऊली फाट्याजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार माय लेकाचा जागीच मृत्यू

माजलगाव; पुढारी वृत्तसेवा : माजलगाव ते गढी रोडवरील माऊली फाट्या जवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकचा व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील माय लेकरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (दि.४) संध्याकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या विषयी मिळालेली माहिती अशी की, आज (दि.४) रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान माजलगाव–गढी रोडवर माऊली फाटा (हारकी … The post बीड : माऊली फाट्याजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार माय लेकाचा जागीच मृत्यू appeared first on पुढारी.

बीड : माऊली फाट्याजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार माय लेकाचा जागीच मृत्यू

माजलगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : माजलगाव ते गढी रोडवरील माऊली फाट्या जवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकचा व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील माय लेकरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (दि.४) संध्याकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
या विषयी मिळालेली माहिती अशी की, आज (दि.४) रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान माजलगाव–गढी रोडवर माऊली फाटा (हारकी लीमगाव) येथे ऊस वाहतूक करणारा ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. यामधे दुचाकीवरील भागवत उर्फ पप्पु सुभाष इंगळे (वय २२ वर्षे) व मालन सुभाष इंगळे (वय ४७ वर्षे) रा.राजेगाव हे माय लेक जागीच ठार झाल्याची घटना घडली. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.या घटनेमुळे राजेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Latest Marathi News बीड : माऊली फाट्याजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार माय लेकाचा जागीच मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.