बारामतीत लॉजमधील खोलीत महिलेचा खून

बारामती; Bharat Live News Media वृत्तसेवा : बारामती शहरातील सिनेमा रस्त्यावरील गंगासागर लॉज येथे एका महिलेच्या खूनाची घटना घडली. रेखा विनोद भोसले (पत्ता अद्याप समजलेला नाही) असे त्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
धारदार हत्याराने हा खून करण्यात आला आहे. या महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या अवस्थेत लॉजमध्ये मिळून आला. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पतीनेच हा खून केला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. हे पती- पत्नी गेल्या तीन वर्षांपासून विभक्त राहत होते. घटस्फोटाच्या कारणावरुन त्यांच्यात वाद होता. त्यातूनच पतीने हा प्रकार केला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान घटनेनंतर पती लॉजमधून पसार झाला आहे.
Latest Marathi News बारामतीत लॉजमधील खोलीत महिलेचा खून Brought to You By : Bharat Live News Media.
