पूर्णा ते चुडावा मार्गावर ऑटोरिक्षाची मोटारसायकलला धडक, चार जखमी

पूर्णा,Bharat Live News Media वृत्तसेवा : पूर्णा ते चुडावा या मुख्य रस्त्यावर गौर गावानजीक आज (दि. ४) दुपारी ४ वाजताच्या दरम्यान ऑटोरिक्षा व मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले असून जखमींवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या विषयी सविस्तर माहिती अशी की, शेख जावेद शेख रशिद (वय २४) शेख मुसा शेख बाशिर (वय २४), शेख जलिल शेख पाशा मियां (रा पिंपळा भत्या) हे ऑटोरिक्षा मधून परभणी येथे ऊरुसासाठी जात होते. तर अक्षय शिवाजी अंतरकर (वय २२) आणि लहू गंगाराम अंतरकर हे पूर्णेहून आपल्या मोटारसायकलवरुन न-हापूर गावाकडे जात होते. ही दोन्ही वाहने पूर्णा-चुडावा रोडवर धनगर टाकळी फाट्याजवळ काही अंतरावरील गौर गावानजीक ऑटोरिक्षा व मोटारसायकलची जोरदार धडक झाली.
यामध्ये, ऑटोरिक्षातील शेख जावेद, शेख मुसा, शेख जलील आणि मोटारसायकलस्वार अक्षय अंतरकर हे जखमी झाले. यातील शेख जावेद व अक्षय अंतरकर हे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चुडावा पोलीस ठाण्यात कळाली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर करत आहेत.
Latest Marathi News पूर्णा ते चुडावा मार्गावर ऑटोरिक्षाची मोटारसायकलला धडक, चार जखमी Brought to You By : Bharat Live News Media.
