
ठाणे: Bharat Live News Media वृत्तसेवा : कलंकित अजित पवार हे बारामतीकरांना आणि महाराष्ट्राला कधीच आवडणार नाही, अशी सडकून टीका माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (शरद पवार गट ) जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली. अजित पवारांसारखा कृतघ्न कोणीच नाही, या शब्दांत आव्हाड यांनी पवारांवर संताप व्यक्त केला. बारामतीसाठी मी हे केले ते केले, असे सांगणाऱ्या अजित पवारांना बारामती दिली कोणी ? असा टोलाही आव्हाड यांनी यावेळी लगावला. Jitendra Awhad On Ajit Pawar
ही शेवटची निवडणूक आहे, असे भावनिक आवाहन करून मते मागितली जातील, अशी टीका पवार यांनी बारामतीत शरद पवार यांचे नाव न घेता केली होती. या टीकेचा आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत खरपूस समाचार घेतला. Jitendra Awhad On Ajit Pawar
आव्हाड म्हणाले की, आपली उंची ओळखा, कुठे शरद पवार आणि कुठे आपण. शरद पवार यांचे प्रत्येक निर्णय महाराष्ट्राच्या हिताचे आहेत. तुमचा एक निर्णय तरी दाखवा, अजित पवार यांनी त्यांचे दिल्लीतील एक भाषण दाखवावे, असे आव्हान करून शेवटच्या निवडणुकीची वेळ तुमच्यावर पण येणार आहे, येणाऱ्या काळात जनता आणि बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील, असा टोला आव्हाड यांनी यावेळी लगावला.
महाराष्ट्र जाळायचा आहे का ? भुजबळांवरही साधला निशाणा
छगन भुजबळ जे करत आहेत ते अतिशय वाईट आहे. नाभिक समाजाने बहिष्कार टाकला, तर नुकसान कोणाचे होईल, भुजबळ त्यांना पैसे पुरवणार आहेत का? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. दोन समाजामध्ये का वाद निर्माण करत आहात. महाराष्ट्राची लाज काढताय, महाराष्ट्र जाळायचं आहे का ? असा संताप त्यांनी व्यक्त केला. भुजबळ खोटं बोलतात, राजीनामा दिला ना मग सुविधा कसल्या घेता असा सवाल आव्हाड यांनी केला.
Jitendra Awhad On Ajit Pawar : निवासस्थानी बॉम्बची अफवा
जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद या बंगल्यात शनिवारी रात्री बॉम्ब असल्याच्या एका निनावी फोन आल्यामुळे खळबळ उडाली होती. पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये फोन आला होता की घरी बॉम्ब ठेवला आहे. त्यामुळे घरी पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक आले होते, त्यांना काहीही सापडले नसल्याचे आव्हाड यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा
अजित पवारांना शरद पवार कळलेच नाही : जितेंद्र आव्हाडांची टीका
Jitendra Awhad On Rahul Narvekar : ‘यापेक्षा मोठी शोकांतिका काय’; राहुल नार्वेकरांबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट चर्चेत
Jitendra Awhad : मी तसे बोललोच नाही, जितेंद्र आव्हाड यांचे ‘त्या’ विधानावर घूमजाव
Latest Marathi News “तुमचा इतका कृतघ्न…”; जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका Brought to You By : Bharat Live News Media.
