महाराष्ट्रात गँगवॉर सुरू; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : दिघा रेल्वे स्थानक, अटल सेतू प्रकल्प उभारून पूर्ण झाले होते, मात्र उद्घाटनासाठी सरकारला मुहूर्त नव्हता. कोस्टल रोडचे काम पूर्ण देखील झाले नाही. तरी केवळ निडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन उद्घाटनाचा घाट घातला आहे. कोस्टल रोडचे काम आमचे आहे, उध्दव ठाकरे यांचे ते स्वप्न होते. दर महिन्याला आम्ही भेटी द्यायचो. आमचे सरकार असते, तर … The post महाराष्ट्रात गँगवॉर सुरू; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल appeared first on पुढारी.

महाराष्ट्रात गँगवॉर सुरू; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : दिघा रेल्वे स्थानक, अटल सेतू प्रकल्प उभारून पूर्ण झाले होते, मात्र उद्घाटनासाठी सरकारला मुहूर्त नव्हता. कोस्टल रोडचे काम पूर्ण देखील झाले नाही. तरी केवळ निडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन उद्घाटनाचा घाट घातला आहे. कोस्टल रोडचे काम आमचे आहे, उध्दव ठाकरे यांचे ते स्वप्न होते. दर महिन्याला आम्ही भेटी द्यायचो. आमचे सरकार असते, तर सगळी कामे आम्ही वेळेत पूर्ण केली असती, असे युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले. Aditya Thackeray
युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज (दि.४) मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईतील रेसकोर्स प्रकल्प आणि राज्यातील कायदा व सुरव्यवस्थेवरून राज्य सरकारला धारेवर धरले Aditya Thackeray
Aditya Thackeray : महालक्ष्मी प्रकल्प बिल्डरांच्या मोफत FSI साठी
मुख्यमंत्र्यांचं बिल्डर सोबत साटेलोट सुरू होते. तबेले बांधले जाणार आहेत. पण घोडे हे सुटा बुटतील लोकांचे आहेत. ज्यांना तबेले बांधून दिले जाणार आहेत. पण जनतेचा पैसा त्यासाठी का वापरला जातोय ?. लाच देणे सुरू होते. आत्ता सेंट्रल पार्कचा घाट घातला जातोय. कोणत्या बिल्डरसाठी हे सुरू आहे ? सेलिब्रिटींना ट्विट करायला लावले. पण प्रकल्प उभारताना बाजूच्या कोणत्या SRA मध्ये आजू बाजूच्या लोकांना सामावून घेणार ? पण मोफत FSI मुंबईकरांच्या पैशातून बिल्डरला देणार आहात. म्हणूनच मोठ्या प्रमाणात या पार्कला विरोध होत आहे, असे ठाकरे यांनी निक्षून सांगितले.
रेस कोर्सचा वापर हा सामान्य मुंबईकरांना योगा, मॉर्निंग वॉकसाठी होतो. येथे 100 कोटी रुपये खर्च करून तबेले बांधून दिले जाणार आहेत. पण IRWTC हे स्वतः देखील ते करू शकत होते. सेंट्रल पार्क होणार त्याबद्दल मुख्यमंत्री आणि प्रशासक खोटे बोलत आहेत. IRWITC ला मुलुंड येथील जागा घ्यायला लावणार होते. वेलिंग्टन क्लब आणि इतरही क्लबची लिझ संपलेली आहे. आम्ही तिथे लॅण्डस्केप मैदान करायला सांगणार होतो. पण प्रशासक सतत त्यांची भूमिका बदलतायेत. लोकांचा विरोध आहे, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
 
महाराष्ट्रात गँगवॉर सुरू आहे आणि एकनाथ शिंदे गँग लीडर
‘कॅबिनेट मीटिंग मध्ये कायदा व सुव्यवस्था राहिली आहे का ? सरकारमधील आमदार गणपती मिरवणुकीत पिस्तूल काढतात, पोलीस ठाण्यात गोळीबार करतात. आणि अश्या आमदारांना सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष केले जाते. तर यांचे अधिकारी महिलेवर गाडी चालवतात, आमदरचा मुलगा अपहरण करतो, हे सगळं कॅमेरा मध्ये कैद होत आहे. यांच्यावर UAPA कायद्याने कारवाई व्हायला हवी होती. आता भाजपने त्यांची अधिकृत भूमिका या प्रकरणांमध्ये सांगावी, असे आव्हान ठाकरे यांनी भाजपला दिले.
हेही वाचा 

मुंबई : धारावीकरांच्या पुनर्वसनाला मुलुंडकरांचा विरोध; मानवी साखळी करून निदर्शने
मुंबईत सहा ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी
BMC Budget : मुंबई महानगरपालिकेचा २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर

Latest Marathi News महाराष्ट्रात गँगवॉर सुरू; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल Brought to You By : Bharat Live News Media.