अभिषेकच्या ‘त्‍या’ कामगिरीने अमिताभ भावूक; म्‍हणाले, “मला माझ्या …”

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा महानायक अभिनेता आणि बिग बी अमिताभ बच्चन (  Amitabh Bachchan ) कोणत्या-ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात. सध्या अमिताभ यांनी त्याच्या मुलगा अभिनेता अभिषेक बच्चनसाठी सोशल मीडियावर एक खास भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अभिषेकचे भरभरून कौतुक करत त्याचा अभिमान असल्याचे म्हटलं आहे. संबंधित बातम्या  Shraddha Kapoor … The post अभिषेकच्या ‘त्‍या’ कामगिरीने अमिताभ भावूक; म्‍हणाले, “मला माझ्या …” appeared first on पुढारी.
अभिषेकच्या ‘त्‍या’ कामगिरीने अमिताभ भावूक; म्‍हणाले, “मला माझ्या …”

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा महानायक अभिनेता आणि बिग बी अमिताभ बच्चन (  Amitabh Bachchan ) कोणत्या-ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात. सध्या अमिताभ यांनी त्याच्या मुलगा अभिनेता अभिषेक बच्चनसाठी सोशल मीडियावर एक खास भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अभिषेकचे भरभरून कौतुक करत त्याचा अभिमान असल्याचे म्हटलं आहे.
संबंधित बातम्या 

Shraddha Kapoor : घायाळ नजर अन् चेहऱ्यावर गोड हसू…; श्रद्धा व्हाईट अनारकलीमध्ये (video)
Anushka Sharma : कन्फर्म, अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई!, विराट कोहलीचा मित्र म्हणाला…
O Yeong-su : स्क्विड गेम फेम ओह येओंग-सूला लैंगिक अत्याचार प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा

नुकतेच अमिताभ बच्चन (  Amitabh Bachchan ) यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्या ‘घूमर’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अभिषेक आणि सैयामी दोगेजण सोबत असून सैयामीच्या हातात बॉल दिसतोय. अभिषेकने ब्लॅक रंगाचे जॅकेट आणि सयामीने व्हाईट कलरचा ट्रॅक शूट परिधान केलाय. याशिवाय एका व्हाईट कलरच्या बॉलच्या भोवती ‘घूमर’ चित्रपटाचे नाव ठळक अक्षरात लिहिले आहे. ही पोस्ट बिग बींनी खास करून भावनिक होत अभिषेकच्या यशासाठी केली आहे. कारण, नुकतेच ‘घूमर’ चित्रपटाने एका अवॉर्ड शोमध्ये तीन पुरस्कार जिंकले आहेत.
या फोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ”अभिषेक, माझी प्रार्थना, स्तुती आणि तुझ्यासाठीच हे प्रेम आहे, मला माझ्या मुलाचा अभिमान वाटत आहे. कारण, त्याने खूपच अभिमान वाटावी अशी कामगिरी केली आहे. तूच यासाठी सर्वात जास्त पात्र होतास, फक्त हेच नाही तर अनेक भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यासाठी प्रेम.” यासोबत बिग बींनी रेड हार्ट- रोझ इमोजीही शेअर केलं आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर लगेचच अभिषेकने हात जोडून बिंग बीचे आभार मानले आहे.
ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘घूमर’ हा चित्रपट एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, सैयामी खेर, शबाना आझमी आणि अंगद बेदी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट अर्धांगवायू झालेल्या खेळाडूची विजयी कथा सांगणारा आहे. सैयामीने अर्धांगवायू झालेल्या खेळाडूची तर अभिषेकने तिच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर बाल्की यांनी केले आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

 

View this post on Instagram

 
A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

Latest Marathi News अभिषेकच्या ‘त्‍या’ कामगिरीने अमिताभ भावूक; म्‍हणाले, “मला माझ्या …” Brought to You By : Bharat Live News Media.