नागपूर जिल्हा परिषदेसमोर भाजप आंदोलन करणार : डॉ. आशिष देशमुख

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय पुस्तिकेवर पाच वर्षाची शिक्षा सुनावलेल्या काँग्रेस नेते सुनील केदार यांचा फोटो होता. त्या फोटोची होळी भाजपच्या नगरसेवकांनी केल्याने रागावलेल्या सुनील केदार यांच्या सांगण्यावरून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी जिल्हा परिषद परिसरात लागलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासले. ही निंदनीय घटना असल्याने सोमवारी (दि.५)  जिल्हा परिषदेसमोर भाजपकडून … The post नागपूर जिल्हा परिषदेसमोर भाजप आंदोलन करणार : डॉ. आशिष देशमुख appeared first on पुढारी.

नागपूर जिल्हा परिषदेसमोर भाजप आंदोलन करणार : डॉ. आशिष देशमुख

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपूर जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय पुस्तिकेवर पाच वर्षाची शिक्षा सुनावलेल्या काँग्रेस नेते सुनील केदार यांचा फोटो होता. त्या फोटोची होळी भाजपच्या नगरसेवकांनी केल्याने रागावलेल्या सुनील केदार यांच्या सांगण्यावरून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी जिल्हा परिषद परिसरात लागलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासले. ही निंदनीय घटना असल्याने सोमवारी (दि.५)  जिल्हा परिषदेसमोर भाजपकडून या घटनेचा निषेध म्हणूण मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी दिली.
छगन भुजबळ राजीनामा संदर्भात माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले की, राज्यातील सगळ्या प्रमुख नेत्यांची एकच भूमिका आहे की, ओबीसी समाज आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आणि छगन भुजबळ देखील याच मताचे आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की, त्यांनी अडीच महिन्यापूर्वी दिलेला राजीनामा तो आज पर्यंत मंजूर झाला नसेल. सरकार ओबीसी समाजाच्या पाठीशी असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा 

नागपूर : वाठोडा परिसरात आर्थिक वादातून दुहेरी हत्याकांड
नागपूर ते सिंगापूर थेट विमान सेवा; ज्योतिरादित्य सिंधिया यांचा गडकरींच्या मागणीला प्रतिसाद
नागपूरमध्ये मराठा आरक्षण सर्वेक्षक महिला बेशुद्ध; सहकाऱ्यांसह नागरिक धावले मदतीला

Latest Marathi News नागपूर जिल्हा परिषदेसमोर भाजप आंदोलन करणार : डॉ. आशिष देशमुख Brought to You By : Bharat Live News Media.