छगन भुजबळांचा गौप्यस्फोट : नोव्हेंबर महिन्यातच दिला होता राजीनामा

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
मराठा आरक्षणावरून शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना अपशब्द वापरले. त्यास भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तरही दिले. भुजबळ म्हणाले की, गायकवाड यांनी माझ्याबद्दल जे अपशब्द वापरले ते ऐकून वाईट वाटले. त्यांनी भाषा जरा जपून वापरली पाहिजे. ते म्हणाले होते की, कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रीमंडळाबाहेर काढा. मला मंत्रिमंडळाबाहेर काढायचे की ठेवायचे, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे.
या घटनेनंतर भुजबळ यांनीच गौप्यस्फोट करुन राजीनामा दिल्याचे स्पष्ट केलं आहे की,लाथ मारायची गरज नाही आपण खुद्दच १६ नोव्हेंबर रोजी राजीनामा दिलेला आहे. भुजबळ यांनी सांगितले की, मंत्रिमंडळातील मंत्र्यांना भूमिका पटत नसल्याने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून राजीनामा दिल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. गेल्या वर्षी १६ नोव्हेंबर रोजीच दुपारी १२ वाजता छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांनीच ओबीसी एल्गार सभेतून तसा मोठा गौप्यस्फोट केला आहे. यानंतर १८ नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यासंदर्भात बैठक घेतली. दरम्यान, त्याच दिवशी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून हा राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती सरकारकडून करण्यात आली आहे.
Latest Marathi News छगन भुजबळांचा गौप्यस्फोट : नोव्हेंबर महिन्यातच दिला होता राजीनामा Brought to You By : Bharat Live News Media.
