ठाणे : आ. गणपत गायकवाड यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

नेवाळी (ठाणे) : पुढारी वृत्तसेवा : अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जमिनीच्या वादातून कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात गणपत गायकवाड यांना अटक केली आहे. आता त्यांच्यावर आणखी एक अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. द्वारली गावातील जाधव या शेतकऱ्याने गायकवाड यांच्यासह सात जणांविरोधात … The post ठाणे : आ. गणपत गायकवाड यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

ठाणे : आ. गणपत गायकवाड यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

नेवाळी (ठाणे) : Bharat Live News Media वृत्तसेवा : अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जमिनीच्या वादातून कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात गणपत गायकवाड यांना अटक केली आहे. आता त्यांच्यावर आणखी एक अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. द्वारली गावातील जाधव या शेतकऱ्याने गायकवाड यांच्यासह सात जणांविरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. MLA Ganpat Gaikwad
कल्याण पूर्वेतील अंबरनाथ तालुक्याच्या महसुली हद्दीत असलेल्या द्वारली गावात कुटुंबियांच्या जमिनीचा वाद सुरु होता. या जमिनीचा वाद न्यायालयापर्यंत देखील गेला होता. या जमिनीच्या वादाचा निकाल आमदार गायकवाड यांच्या बाजूने लागला होता. या नंतर आमदार गायकवाड यांनी संबंधित जमिनीला संरक्षण भिंत बांधायला सुरुवात केली होती. आमदार गणपत गायकवाड यांनी ३१ जानेवारीरोजी दुपारी १ वाजता जातीवाचक शिविगाळ केली, असा आरोपी शेतकऱ्यांनी केला होता. MLA Ganpat Gaikwad
त्यामुळे त्यांच्यासह जितेंद्र पारीक, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, नगेश वारघेट यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे फायरिंग करून सध्या पोलीस कोठडीत असलेल्या आमदार गायकवाड यांच्यावर अन्य एका गुन्ह्याची भर पडली असल्याने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील नीता एकनाथ जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 31 जानेवारीरोजी गणपत गायकवाड आणि इतरांनी आमच्या जागेवर संरक्षण भिंतीचे करण्याचे काम सुरु केले. आम्ही त्यांना जाब विचारला तेव्हा आमदार गणपत गायकवाड यांनी आम्हास मारण्यासाठी फावड्याचा दांडका उचलला. त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ केली, असे तक्रारीत म्हटले आहे.
MLA Ganpat Gaikwad : शेतकऱ्यांकडून सुरक्षेची मागणी
आमदार गायकवाड यांनी जाधव कुटुंबियांच्या जमिनीवरून महेश गायकवाड आणि राहुल पाटील आणि चैनु जाधव यांच्या दिशेने गोळीबार पोलीस ठाण्यात केला आहे. त्यामुळे आमच्या जीवाला धोका असून आम्हाला शासनाने सुरक्षा दयावी, अशी मागणी जमीन मालकांनी देखील केली आहे.
हेही वाचा 

Who is Ganpat Gaikwad? | शिंदे गटाच्या नेत्यावर गोळ्या झाडणारे भाजप आमदार गणपत गायकवाड कोण आहेत?
Who is Ganpat Gaikwad? | शिंदे गटाच्या नेत्यावर गोळ्या झाडणारे भाजप आमदार गणपत गायकवाड कोण आहेत?
Ganpat Gaikwad | गणपत गायकवाडांच्या गोळीबाराचा थरार! नेमकं काय घडलं?

Latest Marathi News ठाणे : आ. गणपत गायकवाड यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.