घायाळ नजर अन् चेहऱ्यावर गोड हसू…; श्रद्धा व्हाईट अनारकलीमध्ये
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ( Shraddha Kapoor ) चित्रपटातील अभिनयासोबत तिच्या सिझलिंग आणि देसी लूकनं नेहमीच चर्चेत असते. श्रद्धा नुकतेच एका कार्यक्रमात स्पॉट होताच तिच्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या. यावेळी श्रद्धाने व्हाईट अनारकली ड्रेसनं चारचाँद लावलेत, मात्र तिच्या चेहऱ्यावरील क्यूट हावभावाने चाहत्याचे लक्ष वेधून घेतलंय. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
संबंधित बातम्या
Anushka Sharma : कन्फर्म, अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई!, विराट कोहलीचा मित्र म्हणाला…
O Yeong-su : स्क्विड गेम फेम ओह येओंग-सूला लैंगिक अत्याचार प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा
Shraddha Kapoor ने लम्बोर्गिनी तर Pooja Hegde ने खरेदी केली रेंज रोव्हर
अभिनेत्री श्रद्धा कपूर ( Shraddha Kapoor ) नुकतेच व्हाईट अनारकली ड्रेसमध्ये कार्यक्रमातील एका सीटवर बसलेली दिसत आहे. यावेळी श्रद्धाच्या समोर ‘मेरी बातें में मेरा जिक्र सदा…’ या हिंदी गाण्याचे बोल ऐकायला मिळत आहे. या गाण्यावर श्रद्धा मौजमस्ती करत आनंदात हळू आवाजात गातानाही दिसतेय. हा अनारकली ड्रेसवर लांब ओढणीसोबत भरगच्च डिझाईन केली आहे. मोकळे केस, कानात झुमके, कपाळावर टिकली, मेकअप आणि लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केलीय. यावेळी श्रद्धा कपूर खूपच ग्लॅमरस दिसतेय.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘Her biggest flex is she doesn’t have to ,Just look at those cute expressions 😘❤️’ असे लिहिलं आहे. श्रद्धाचा हा व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. याशिवाय श्रद्धाच्या पाठिमागे काही रिकाम्या खुर्च्या आणि काही मोजकेच मान्यवर बसलेले दिसत आहेत. मात्र, श्रद्धा गाण्याचा नादात चेहऱ्यावर क्यूट हावभाव करत असल्याने चर्चेत आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला. आहे. आतापर्यत या व्हिडिओला १ लाख ३६ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.
श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती शेवटची बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत ‘तू झूठी मैं मक्कार’ मध्ये दिसली होती. याशिवाय लवकरच ती आगामी ‘स्त्री २’ चित्रपटात दिसणार आहे.
(video : viralbhayani instagram वरून साभार)
View this post on Instagram
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
Latest Marathi News घायाळ नजर अन् चेहऱ्यावर गोड हसू…; श्रद्धा व्हाईट अनारकलीमध्ये Brought to You By : Bharat Live News Media.