कन्फर्म, अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई!, विराटचा मित्र म्हणाला…
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma ) तिच्या प्रेग्नेंसीबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेला उधान आलं आहे. मात्र, अनुष्का आणि पती विराट कोहली याबाबतची कोणतीच अधिकृत्त माहिती समोर आलेली नाही. दरम्यान विराट कोहलीचा मित्र कर्णधार एबी डिव्हिलियर्सने अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. यामुळे अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याचे कन्फर्म झाले आहे.
संबंधित बातम्या
O Yeong-su : स्क्विड गेम फेम ओह येओंग-सूला लैंगिक अत्याचार प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा
Ram Mandir-Anushka Sharma : व्हायरल झालेल्या फोटोत अनुष्का? काय म्हणतात नेटकरी…
Anushka Sharma : गुड न्यूज! अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नेंट
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने नुकतेच एका मुलाखतीत क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याचे सांगितले. या मुलाखतीत तो म्हणाला की, भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून भारतीय फलंदाजाने माघार घेतल्यानंतर विराटला मी फोन केला होता. यावेळी विराटने स्वत : ठिक असून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असल्याचे सांगितले आहे. यावरून विराटची पत्नी अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असून प्रेग्नेंट असल्याचे संकेत मिळत आहेत.
यापुढे एबीने म्हटलं आहे की, विराटच्या या निर्णयाचे मी भरभरून कौतुक केले आहे कारण, त्याने प्रथम कुटुंबाला प्राधान्य दिलं आहे यांचा मला अभिमान वाटतोय. यासोबत विराटच्या क्रिकेटमधील कामगिरीबद्दलही त्याने त्याचे कौतुक केलं आहे. या सगळ्यामुळे सोशल मीडियावर अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, अनुष्का किंवा विराटकडून अद्याप अधिकृत कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा २०१७ मध्ये लग्न बंधनात अडकले. यानंतर अनुष्काने मुलगी ‘वामिका’ला जन्म दिला. यावर्षी जानेवारी महिन्यात वामिकाचा तिसरा वाढदिवस दोघांनी दणक्यात साजरा केला.
Ab De Villiers said – “Virat Kohli and Anushka Sharma expecting their second child, so Virat Kohli is spending his time with his family”. (On ABD YT)#viratkohli #anushkasharma pic.twitter.com/XDqx76ZfeX
— 𝙒𝙧𝙤𝙜𝙣🥂 (@wrogn_edits) February 3, 2024
View this post on Instagram
A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)
Latest Marathi News कन्फर्म, अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई!, विराटचा मित्र म्हणाला… Brought to You By : Bharat Live News Media.