उस्मानाबाद : उमरग्यात आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडले
उमरगा; धाराशिव; शंकर बिराजदार धाराशिवच्या उमरगा शहरातील मुख्य रस्त्यालगत श्रीराम मंगल कार्यालया शेजारी आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन आहे. हे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी गॅसकटरने फोडले. हि घटना आज (रविवार) पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान एटीएम मशीन मधून चोरट्यांनी नेमकी किती रक्कम पळविली याची माहिती मिळू शकलेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. ठसे तज्ञांचे पथकही दाखल झाले असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासणी सुरू केली आहे. चार दिवसांपूर्वी उमरगा तालुक्यातील बलसूर येथील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरने फोडून साधारणतः आठ लाखांची रोकड लंपास केली होती. पोलिसांना या घटनेतील अद्याप कसलाही सुगावा लागला नसताना उमरगा शहरातील एटीएम मशीन फोडून चोरट्यांनी पोलांसाना तपासाचे आव्हान दिले आहे. दरम्यान वाढत्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा :
Delhi Police Crime Branch: मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यानंतर ‘मंत्री अतिशीं’च्या घरी दिल्ली पोलीस
पंतप्रधानांनी महाराष्ट्राबद्दलही औदार्य दाखवावे : शरद पवार
राज कपूर यांचे योगदान अभूतपूर्व : राज्यपाल रमेश बैस
Latest Marathi News उस्मानाबाद : उमरग्यात आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडले Brought to You By : Bharat Live News Media.