पुणे : ट्रेलर उलटल्याने विद्यापीठ चौकात प्रचंड वाहतूक कोंडी
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे विद्यापीठ चौकाजवळ राजभवन इथं सकाळी मेट्रोचे साहित्य घेऊन जाणारा एक ट्रेलर पलटी झाला. त्यामुळे बाणेर, औंध रोडवर शनिवारी सकाळीच वाहतूक कोंडी झाली. ही वाहतूक कोंडी दुपारपर्यंत कायम होती. यानंतर सायंकाळनंतर पुन्हा दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता. गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठासमोरील आनंदऋषीजी महाराज चौक परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे.
या कामांसाठी आलेला मालवाहू ट्रेलर राजभवनजवळ चतु:शृंगी पोलिस ठाण्यासमोर यूटर्न घेताना उलटला. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे ब्रेमेन चौकातून विद्यापीठासमोरून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बोपोडीमार्गे वळविण्यात आली. या घटनेमुळे दररोज सकाळी विद्यापीठ चौकासमोर होणार्या वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. या परिसरात सकाळी ऑफिससाठी बाहेर पडलेले नागरिक आणि शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या वाहनांचा मोठा खोळंबा झाला.
दरम्यान, सांगवीकडून विद्यापीठाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली. तसेच ब्रेमेन चौकातून येणारी वाहतूक बोपोडीच्या दिशेने वळवण्यात आली. कंटेनर उलटल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. या अपघातामुळे ब्रेमेन चौकातून विद्यापीठासमोरून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बोपोडीमार्गे वळविण्यात आली. दुपारी दीडच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने कंटेनर आणि ट्रेलरवरून पडलेला गर्डर हलविण्यास वाहतूक शाखेला यश आले. यानंतर वाहतूक थोड्यापार प्रमाणात सुरळीत झाली. मात्र, त्यानंतरही मेट्रोचे काम सुरू असल्याने दोन्ही बाजूने बॉटल नेकसारखी परिस्थिती असल्याने ही कोंडी रात्री उशिरापर्यंत कायम होती.
कंटेनर आणि त्यातून पडलेला गर्डर भलामोठा असल्याने तो हलवण्यासाठी मोठ्या क्रेनची व्यवस्था करावी लागली. या क्रेनची व्यवस्था होईपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. दुपारी दीडच्या सुमारास कंटेनर आणि गर्डर हलवण्यात यश आले. यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
– शशिकांत बोराटे, उपायुक्त, वाहतूक शाखा.
हेही वाचा
नोझलमध्ये हेराफेरी : वैधमापनच्या संगनमताने इंधन चोरी!
सरड्याप्रमाणे वेगाने रंग बदलणारा मासा
पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 20 जण जखमी
Latest Marathi News पुणे : ट्रेलर उलटल्याने विद्यापीठ चौकात प्रचंड वाहतूक कोंडी Brought to You By : Bharat Live News Media.