शेंगभाज्या का खाव्यात?

शेंगभाज्यातील विरघळणारे तंतू हे पित्तरसावर परिणाम घडवतात. ज्यायोगे आहारातील स्निग्ध पदार्थांचे शोषण पूर्णत: होत नाही. त्यामुळे मग कोलेस्टेरॉलच्या निर्मितीवरदेखील आळा बसतो. कारण, शेंगभाज्या या कोलेस्टेरॉलची पातळी आटोक्यात ठेवण्यास मदत करतात. ( Green Vegetable ) संबंधित बातम्या  Pudhari Health : शेंगभाज्या का खाव्यात? Vegetables Market : भाज्यांचे भाव कडाडले; नागरीकांच्या खिशावर संक्रांत पालेभाज्या स्वस्त, तर भेंडी, … The post शेंगभाज्या का खाव्यात? appeared first on पुढारी.

शेंगभाज्या का खाव्यात?

मंजिरी फडके

शेंगभाज्यातील विरघळणारे तंतू हे पित्तरसावर परिणाम घडवतात. ज्यायोगे आहारातील स्निग्ध पदार्थांचे शोषण पूर्णत: होत नाही. त्यामुळे मग कोलेस्टेरॉलच्या निर्मितीवरदेखील आळा बसतो. कारण, शेंगभाज्या या कोलेस्टेरॉलची पातळी आटोक्यात ठेवण्यास मदत करतात. ( Green Vegetable )
संबंधित बातम्या 

Pudhari Health : शेंगभाज्या का खाव्यात?
Vegetables Market : भाज्यांचे भाव कडाडले; नागरीकांच्या खिशावर संक्रांत
पालेभाज्या स्वस्त, तर भेंडी, वांगी, गवार तोर्‍यात

सर्व शेंगभाज्या या विविध क्षारांनी परिपूर्ण असून, त्यांच्यातील चरबीची मात्रा अगदीच न्यूनतम (0.1 ग्रॅम : 1 ग्रॅम प्रती 100 ग्रॅम) आहे. ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे आहे. परंतु, अर्धपोटी राहायचे नाही, अशांनी आपल्या रोजच्या एका जेवणात कुठलीतरी शेंगभाजी घ्यावी. अर्थात, यात तेल अगदी नावाला असावे. तसेच शेंगदाणा कूट, खोबरे घातलेले नसावे.
हायकोलेस्टेरॉल, डायबेटिस, उच्च रक्तदाब, पित्ताशयातील खडे, शौचास साफ न होणे अशा ज्या स्थूलतेशी निगडित समस्या आहेत. येथेही शेंगभाज्या उपयुक्त ठरतात. शेंगभाज्यांमध्ये भरपूर चोथा असतो.
शेंगभाज्यांचे फायदे पुढीलप्रमाणे
— शेंगभाज्यातील चोथ्यामुळे पोट भरल्याची जाणीव लवकर होते व ती अधिक काळ टिकते. वेटलॉस करणार्‍यांसाठी ही उत्तम ठरते.
— चोथ्यामुळे लहान तसेच मोठ्या आतड्याचे कार्य सुधारते. शेंगभाज्यातील विरघळणार्‍या तंतूमुळे मोठ्या आतड्यातील मित्रजीवाणूंच्या कार्याला मदत होते. चयापचय क्रियेवर याचा अतिशय चांगला परिणाम होतो. मोठ्या आतड्यातील आतल्या स्तरातील पेशींनादेखील या तंतूमुळे मलबांधणीच्या कामाला मदत होते.
-शेंगभाज्यातील विरघळणारे तंतू हे पित्तरसावर परिणाम घडवून आणतात. ज्यायोगे आहारातील स्निग्ध पदार्थांचे शोषण पूर्णत: होत नाही. त्यामुळे मग कोलेस्टेरॉलच्या निर्मितीवरदेखील आळा बसतो. थोडक्यात असे की, शेंगभाज्या या कोलेस्टेरॉलची पातळी आटोक्यात ठेवण्यास मदत करतात.
— चोथ्यामुळे साखरेचे शरीरात शोषण होण्यास बाधा निर्माण होते. मधुमेहींसाठी ही गोष्ट फायद्याची आहे. मधुमेहींना या भाज्या कमी तेलात कराव्यात व चवीसाठी साखर, गूळ किंवा खोबरे घालू नये. रक्तातील साखरेची पातळी समसमान राखणे, कोलेस्टेरॉल वाढू न देणे, आतड्याचे आरोग्य सांभाळणे व तृप्तीची भावना अधिक काळ शाबूत ठेवणे हे चार महत्त्वाचे आरोग्यदायी परिणाम शेंगभाज्यातील चोथ्यामुळे साधले जातात. ( Green Vegetable )
Latest Marathi News शेंगभाज्या का खाव्यात? Brought to You By : Bharat Live News Media.