Dhule | अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी फिरोज सैय्यद
पिंपळनेर, जि.धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा
येथील भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते, धुळे भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष फिरोजअली अब्बासअली सैय्यद यांच्या कामाची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी विचार विनिमय करून भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ईद्रीसभाई मुलतानी यांनी फिरोजअली अब्बासअली सैय्यद यांची भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीबद्दल आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, पालकमंत्री गिरीष महाजन,कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष सैय्यद पाशा पटेल, खासदार डॉ.हिना गावित, खा. डॉ.सुभाष भामरे, आ. अमरीशभाई पटेल, आ. जयकुमार रावल, संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे, जिल्हाध्यक्ष बबनभाऊ चौधरी, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संभाजीराव पगारे, अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश महामंत्री एजाजभाई शेख, जाकीर पठाण, तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, विधानसभा प्रमुख मोहन सुर्यवंशी, मंडलाध्यक्ष विक्की कोकणी, पिंपळनेर शहराध्यक्ष डॉ.राजेंद्र पगारे, ईशरतअली सैय्यद आदींनी अभिनंदन केले आहे.
हेही वाचा:
नोझलमध्ये हेराफेरी : वैधमापनच्या संगनमताने इंधन चोरी!
अण्णासाहेब चकोते यांना संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार प्रदान
BJP Politics : दहा वर्षांत भाजपकडून बदललेले मुख्यमंत्री
Latest Marathi News Dhule | अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी फिरोज सैय्यद Brought to You By : Bharat Live News Media.