चिरमुर्‍यांसारखे खिळे खाणारा माणूस!

नवी दिल्ली : जगाच्या पाठीवर अत्यंत विचित्र आहार घेणारीही काही माणसं आहेत. कुणी वाळू खाते तर कुणी माती. काही लोक तर ज्या वस्तू शरीराला अत्यंत हानिकारक ठरू शकतात अशा वस्तूही गट्टम करीत असतात. अर्थात त्यामागे काही तरी विकार किंवा विकृतीही असू शकते. आता एका माणसाच्या अशाच विचित्र आहाराचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा माणूस … The post चिरमुर्‍यांसारखे खिळे खाणारा माणूस! appeared first on पुढारी.

चिरमुर्‍यांसारखे खिळे खाणारा माणूस!

नवी दिल्ली : जगाच्या पाठीवर अत्यंत विचित्र आहार घेणारीही काही माणसं आहेत. कुणी वाळू खाते तर कुणी माती. काही लोक तर ज्या वस्तू शरीराला अत्यंत हानिकारक ठरू शकतात अशा वस्तूही गट्टम करीत असतात. अर्थात त्यामागे काही तरी विकार किंवा विकृतीही असू शकते. आता एका माणसाच्या अशाच विचित्र आहाराचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा माणूस चिरमुरे-फुटाणे तोंडात टाकण्याच्या सहजतेने चक्क मूठ भरून खिळे तोंडात टाकत असताना दिसतो!
अलिकडे सोशल मीडियावर ‘फ्यूजन डिश’ हा एक नवीन फूड ट्रेंड बनला आहे. लोक रोज नवनवीन रेसिपी ट्राय करत आहेत, त्या सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. एखादा पदार्थ आवडतो म्हणजे त्याची चव आवडते आणि ती दुसर्‍या कोणत्या पदार्थासोबत अधिक चविष्ट लागेल याचा विचार होतो. जगभर जे फ्यूजन फूड मिळतेय त्यामागे हाच विचार मुख्य असतो. त्यातून अनेक चवीचे संगम घडलेत.
मात्र, काही लोक खूपच विरुद्ध पदार्थ एकत्र करून खातात. मात्र आता समोर आलेल्या या व्हिडीओने या सगळ्याला मागे सोडले आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आपण चिवडा ज्याप्रमाणे सहज तोंडात टाकून खातो. तसंच हा व्यक्ती चक्क खिळे खातोय. त्यानं अक्षरश: मूठ भरून खिळे घेतले आहेत आणि तो हे खिळे सहज खातोय. एवढंच नाही तर तो व्यक्ती ते गिळतही आहे. त्यानंतर त्याच्या हातात पाण्याची बॉटल दिसत आहे. तो खिळे खाल्ल्यावर त्यावर पाणीही पित आहे.
शेजारी बसलेला एक माणूस हसत हसत त्याला खिळ्यांचा एक घास भरवत असतानाही यामध्ये दिसून येते! हा व्हिडीओ पाहताना तुमच्याही अंगावर काटा येईल, मात्र हा व्यक्ती अगदी सहज खिळे खात आहे. हे पाहून पाहून सर्वच हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका यूजरने म्हटलंय ‘हा माणूस आहे की राक्षस’, त्याचवेळी दुसरा म्हणतो ‘अजून काय काय पहावं लागणार आहे.’
Latest Marathi News चिरमुर्‍यांसारखे खिळे खाणारा माणूस! Brought to You By : Bharat Live News Media.