अँडरसनचा भारताला दुहेरी झटका, रोहित पाठोपाठ यशस्वी बाद

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsENG 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. स्पर्धेचा आज (दि. 4) तिसरा दिवस आहे. टीम इंडियाने आपल्या दुस-या डावात दोन विकेट गमावून 34 धावा केल्या असून एकूण आघाडी 181 धावा झाली आहे. … The post अँडरसनचा भारताला दुहेरी झटका, रोहित पाठोपाठ यशस्वी बाद appeared first on पुढारी.

अँडरसनचा भारताला दुहेरी झटका, रोहित पाठोपाठ यशस्वी बाद

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : INDvsENG 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. स्पर्धेचा आज (दि. 4) तिसरा दिवस आहे. टीम इंडियाने आपल्या दुस-या डावात दोन विकेट गमावून 34 धावा केल्या असून एकूण आघाडी 181 धावा झाली आहे.
अँडरसनचा दुहेरी झटका
41 वर्षीय जेम्स अँडरसनने रोहित शर्मा पाठोपाठ यशस्वी जैस्वाललाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यशस्वी 17 धावा करून पहिल्या स्लिपमध्ये झेलबाद झाला. अँडरसनने 9व्या षटकात यशस्वीला आणि 7व्या षटकात रोहितला बाद केले.
रोहित शर्मा 13 धावांवर बाद
तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच षटकात रोहित शर्मा बाद झाला. तो आदल्या दिवशीच्या धावसंख्येत भर घालू शकला नाही. अँडरसनने त्याला गुड लेन्थवर चेंडू टाकला, रोहित बचाव करायला गेला पण बोल्ड झाला. त्याने 21 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 13 धावा केल्या.
तत्पूर्वी, यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. रोहितने यशस्वीसह पहिल्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली. मात्र, रोहित 14 धावा करून बाद झाला. यानंतर यशस्वीने शुभमन गिलसह दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. शुभमन पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आणि 34 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार मारले. श्रेयस अय्यर 27 धावा करून झेलबाद झाला. श्रेयसने यशस्वीसोबत 90 धावांची भागीदारी केली. कसोटी पदार्पण करणारा रजत पाटीदारने 32 धावांची खेळी केली. त्याने यशस्वीसोबत 70 धावांची भागीदारी केली. त्यानंतर यशस्वीने अक्षरसोबत 52 धावांची भागीदारी केली. अक्षरने 27 धावा केल्या. श्रीकर भरत 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यशस्वी 179 धावांवर नाबाद राहिला आणि रविचंद्रन अश्विन पाच धावांवर नाबाद राहिला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात सहा गडी गमावून 336 धावा केल्या होत्या. दुस-या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर अश्विन लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतला, पण यशस्वी त्याचे द्विशतक पूर्ण करून बाद झाला. त्याने 290 चेंडूत 209 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 19 चौकार आणि सात षटकार मारले. भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या. यशस्वी जैस्वाल व्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन, शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. पहिल्या सामन्याचा हिरो असलेल्या टॉम हार्टलीला एक विकेट मिळाली.
भारताच्या 396 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने चांगली सुरुवात केली आणि एकही विकेट न गमावता 50 धावा केल्या. बेन डकेट 17 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने 21 धावा करून बाद झाला, पण क्रॉलीने आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. त्याने अवघ्या 52 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करून इंग्लंडची धावसंख्या एका विकेटवर 100 धावांच्या पुढे नेली. तो 76 धावा करून बाद झाला. यानंतर जसप्रीत बुमराहने ठराविक अंतराने इंग्लंडला धक्के दिले.
इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने 143 धावांची आघाडी घेतली. या सामन्यात जसप्रीत बुमराहने सहा विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय कुलदीप यादवने तीन बळी घेतले. अक्षर पटेलला एक विकेट मिळाली. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 76 धावा केल्या. त्याच्याशिवाय इंग्लंडच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. 47 धावा करणारा बेन स्टोक्स संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. (INDvsENG 2nd Test)
Latest Marathi News अँडरसनचा भारताला दुहेरी झटका, रोहित पाठोपाठ यशस्वी बाद Brought to You By : Bharat Live News Media.