अण्णासाहेब चकोते यांना संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार प्रदान

जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : संत गाडगे महाराज अध्यासन कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार चकोते ग्रुपचे अध्यक्ष, उद्योजक अण्णासाहेब चकोते यांना ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते शनिवारी शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवनमध्ये प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र व शिल्ड असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सनदी … The post अण्णासाहेब चकोते यांना संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार प्रदान appeared first on पुढारी.

अण्णासाहेब चकोते यांना संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार प्रदान

जयसिंगपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : संत गाडगे महाराज अध्यासन कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार चकोते ग्रुपचे अध्यक्ष, उद्योजक अण्णासाहेब चकोते यांना ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते शनिवारी शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवनमध्ये प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र व शिल्ड असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख उपस्थित होते.
मी राज्यात व इतर ठिकाणी फिरत असताना चकोते उत्पादने पाहतो. त्यांचे कार्य नवउद्योजकांना आदर्श घेण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार देशमुख यांनी काढले.
प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष एस. एन. पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय जॉर्ज क्रुज यांनी करून दिला. मानपत्राचे वाचन प्रा. डॉ. सरोज बिडकर यांनी केले.
यावेळी प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. योगेश साबळे, कै. रा. तु. भगत यांचे कुटुंबीय, डॉ. एम. बी. शेख, भारती विद्यापीठाचे प्रा. एच. एम. कदम, विद्यापीठातील पदाधिकारी, प्राध्यापक साहित्यिक आदी उपस्थित होते. एम. डी. देसाई यांनी आभार मानले.
Latest Marathi News अण्णासाहेब चकोते यांना संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार प्रदान Brought to You By : Bharat Live News Media.