भारतात कोरोनापेक्षा कॅन्सरमुळे अधिक मृत्यू प्रज्ञा केळकर-सिंग
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : कोरोनापूर्वी म्हणजेच 2019 मध्ये भारतात जवळपास 9.3 लाख लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला आहे. हे प्रमाण भारत सरकारच्या अधिकृत माहितीनुसार 2020 ते 2022 पर्यंत कोविडमुळे झालेल्या मृत्यूपेक्षा अधिक आहे. फक्त 2019 मध्ये नवीन 12 लाख कॅन्सर रुग्णांची नोंद झाली होती. आशियातील 49 देशांच्या कॅन्सर रुग्णांचा अभ्यास करून 100 पेक्षा अधिक संस्थांमधील संशोधकांनी हे संशोधन मागील आठवड्यात मेडिकल सायन्समधील लॅन्सेट जर्नलमध्ये प्रसिद्ध केले आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कुरुक्षेत्र आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), जोधपूर आणि भटिंडा येथील तज्ज्ञ या संशोधनात सहभागी होते. दोन वर्षांपूर्वी 2022 मध्ये भारतात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या 14.6 लाखांवरून 2025 मध्ये 15.7 लाखांपर्यंत वाढण्याचा अंदाज आरोग्य मंत्रालयाने मार्च 2023 मध्ये राज्यसभेत दिलेल्या माहितीत वर्तवला आहे. चीन आणि जपानच्या बरोबरीने, भारतात धोक्याच्या वाढत्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2019 मध्ये तब्बल 94 लाख नवीन प्रकरणे आणि 56 लाख मृत्यूची नोंद आशियाई देशांमध्ये झाली आहे.
लॅन्सेट आशिया जर्नलच्या माहितीनुसार, आशियाई देशांत कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणाला वायू प्रदूषण सर्वाधिक कारणीभूत आहे. 2019 मध्ये अंदाजे 13 लाख नवीन रुग्ण आणि 12 लाख मृत्यू झाले. विशेषत: भारत, नेपाळ, कतार, बांगलादेश आणि पाकिस्तान यासारख्या अतिशय प्रदूषणशील देशांमध्ये कर्करोगाचा वाढता भार चिंताजनक आहे. भारत, बांगलादेश आणि नेपाळ या देशांमध्ये गुटखा आणि पानमसाला यांसारख्या धूरविरहित तंबाखूच्या सेवनाच्या चिंतेवरही या अभ्यासाने प्रकाश टाकला आहे. 2019 मध्ये जागतिक मृत्यूंपैकी 32.9 टक्के तोंडाच्या कॅन्सरची 28.1 टक्के नवीन प्रकरणे एकट्या भारतात नोंदवली गेली आहेत, अशी माहिती इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी ‘Bharat Live News Media’ शी बोलताना दिली.
आशियातील कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कॅन्सर रुग्णांसाठी असणार्या पायाभूत सुविधा दुर्मिळ आहेत किंवा परवडत नाहीत. विशेषतः ग्रामीण भागात रुग्णांना उशिरा निदान आणि उपचार मिळतात, ज्यामुळे जगण्याचे प्रमाण कमी होते, असे संशोधकांनी सांगितले. त्यामुळे कॅन्सर तपासणी आणि उपचार वेळेवर उपलब्ध होण्यासोबतच त्याची किफायतशीरता किंवा उपचार खर्चाचे धोरणास प्राधान्य असले पाहिजे.
यूरोपियन कमिशनने 2020 मध्ये यूरोपमधील 28 देशांमध्ये कॅन्सर मिशन सुरू केले आहे. यामध्ये या रोगाचा प्रसार रोखणे, लोकांमध्ये चांगल्या राहणीमानाची जागरूकता निर्माण करणे, कमी खर्चात चांगल्या सुविधा निर्माण करणे आणि कॅन्सरवर नवनवीन उपचारपद्धती शोधण्यासाठी संशोधनावर भर देणे, ही या कॅन्सर मिशनची मुख्य उद्दिष्टे आहेत. याच धर्तीवर भारतातील कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारत सरकारने लवकरात लवकर कॅन्सर मिशनची सुरुवात करण्याची काळाची गरज आहे.
– डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, इंग्लंड
हेही वाचा
पंतप्रधानांनी महाराष्ट्राबद्दलही औदार्य दाखवावे : शरद पवार
Pimpri : ‘कलाग्राम’ प्रदर्शनाचे डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकार्यांचे खांदेपालट!
Latest Marathi News भारतात कोरोनापेक्षा कॅन्सरमुळे अधिक मृत्यू प्रज्ञा केळकर-सिंग Brought to You By : Bharat Live News Media.