पिंपरी : ‘कलाग्राम’ प्रदर्शनाचे डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुण्यातील कोरेगाव पार्क येथे कलाग्राम प्रदर्शनास उत्साहात सुरुवात झाली. या प्रदर्शनाचे उद्घाटन राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणेच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी आयोजिका गौरी ढोले पाटील, नूपुर पवार आदी उपस्थित होते. कलाग्राम प्रदर्शन हे कला व उद्योग वाढविण्यासाठी एक व्यासपीठ आहे.
याचमुळे उद्योजकांच्या कल्पकतेला वाव मिळत असून, यातूनच सर्वाभिमुख व्यावसायिक संवादाचे आदानप्रदान होत आहे; तसेच वस्त्रोद्योग, पाककला, शिल्पकला, हस्तकलेला ‘कलाग्राम’ प्रदर्शनातून पाठबळ मिळण्याबरोबरच नवउद्योजक महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी हातभार लावला जात असल्याचे मत या वेळी डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांनी व्यक्त केले. दि. 3 ते 4 फेब्रुवारी रोजी आयोजित दोनदिवसीय प्रदर्शनात 55 पेक्षा अधिक स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले असून, भारताच्या विविध भागातून उद्योजकांनी हजेरी लावली आहे.
आतापर्यंत कलाग्रामचे 40 प्रदर्शन झालेले आहेत आणि 1000 पेक्षा जास्त महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी आणि ‘एनजीओ’ला मदत करण्याच्या उद्देशाने कलाग्रामची स्थापना झालेली आहे. आपल्या मूळ संस्कृतीची अभिव्यक्ती असणारी कला, शिल्पकला आणि कपड्यांचे विविध संग्रह, भारतातील विविध कला वस्तू आहेत. या प्रदर्शनामध्ये लाकडापासून तयार केलेल्या वस्तू, वस्त्रे, गोंड कला, ज्वेलरी, पश्चिम बंगालची कन्टा कढाई, ब्लॉक प्रिंट, कढाई आणि राजस्थानचे वीणकाम, मध्य प्रदेशातील चंदेरी आणि माहेश्वरी, बनारसी विव्हस, उत्तर प्रदेशातील चिकन एम्ब्रॅायडी, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील मातीची भांडी, पश्चिम बंगालमधील लिनन साड्या, ओरिसाचे चांदीचे दागिने आहेत.
हेही वाचा
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणाला सहा महिन्यांची शिक्षा
वारसा : स्वागतार्ह पाऊल
अखेर बोपदेव घाटात विद्यार्थ्यांना लुटणार्या टोळीचा पर्दाफाश
Latest Marathi News पिंपरी : ‘कलाग्राम’ प्रदर्शनाचे डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन Brought to You By : Bharat Live News Media.