भुयारी मार्गाचे काम मुदतीत पूर्ण करा : मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम भागास कायमस्वरूपी जोडण्याकरिता बांधण्यात येत असलेल्या भुयारी मार्गामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांची तसेच अन्य घटकांची मोठी सोय होणार आहे. मार्गाचे काम उत्तम पद्धतीने व मुदतीमध्ये पूर्ण करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. भुयारी मार्गाच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. डी. … The post भुयारी मार्गाचे काम मुदतीत पूर्ण करा : मंत्री चंद्रकांत पाटील appeared first on पुढारी.

भुयारी मार्गाचे काम मुदतीत पूर्ण करा : मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम भागास कायमस्वरूपी जोडण्याकरिता बांधण्यात येत असलेल्या भुयारी मार्गामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांची तसेच अन्य घटकांची मोठी सोय होणार आहे. मार्गाचे काम उत्तम पद्धतीने व मुदतीमध्ये पूर्ण करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. भुयारी मार्गाच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. (Minister Chandrakant Patil)
मंत्री पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा विस्तार काळानुसार पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूंना होतो आहे. भविष्यात पूर्व बाजूला अनेक इमारती व संकुले निर्माण होणार असून दोन्ही बाजू भुयारी मार्गाने जोडण्याची मागणी होती. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून निधीची तरतूद केल्याने हे काम गतीने पूर्ण होईल. (Minister Chandrakant Patil)
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. पी. कुंभार, कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, उपअभियंता हेमा जोशी, कनिष्ठ अभियंता पूजा देसाई, उपकुलसचिव (स्थापत्य) रणजित यादव, कामाचे ठेकेदार राजू इनामदार उपस्थित होते.
भुयारी मार्ग व सेवामार्गाच्या कामाचे स्वरूप
शिवाजी विद्यापीठाच्या पश्चिम बाजूने ग्रंथालयापासून पुणे-बेंगलोर रस्त्यापर्यंतचा एक भाग व रस्त्याच्या पूर्व बाजूपासून सर्व्हिस रस्त्यापर्यंत एक भाग असे दोन जोड रस्ते आहेत. पश्चिम बाजूकडील जोड रस्त्याची लांबी 166.00 मीटर आहे. भुयारी मार्गापर्यंत रस्त्याचा उतार 1:20 इतका आहे. पूर्व बाजूकडील जोड रस्त्याची लांबी 29.32 मीटरआहे. भुयारी मार्गापासून सर्व्हिस रोडपर्यंतचा चढ 1:30 इतका प्रस्तावित आहे.
हेही वाचा :

‘मी १६ नोव्हेंबरलाच राजीनामा दिला’ छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
जसप्रीत बुमराहची इंग्लंड विरुद्ध ‘कमाल’, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला गाेलंदाज
पाेलीस ठाण्‍यात गोळीबार : भाजप आमदार गणपत गायकवाडांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

Latest Marathi News भुयारी मार्गाचे काम मुदतीत पूर्ण करा : मंत्री चंद्रकांत पाटील Brought to You By : Bharat Live News Media.