वडीगोद्री, Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यांनी १६ नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला असा गौप्यस्फोट शनिवारी केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत असताना त्यांनी नगर येथील ओबीसी एल्गार परिषदेत हा गौप्यस्फोट केला. भुजबळ यांच्या या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधला आहे. ते म्हणाले मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही. पण त्यांनी सांगितलं माझी शपथ पूर्ण झाली. तुमची शपथ पूर्ण झालीय. मराठा समाजाला आरक्षण मिळालंय. तर मग सर्व्हेक्षण कशासाठी करत आहात? असा सवाल छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.
हेही वाचा
‘मविआ’च्या बैठकीला न बोलवणे दुर्दैवी: डॉ. राजेंद्र गवई
रामराज्य की गुंडा राज्य : नाना पटोलेंचा राज्य सरकारवर घणाघात
उल्हासनगर येथील गोळीबार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया
Latest Marathi News ‘मी १६ नोव्हेंबरलाच राजीनामा दिला’ छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ Brought to You By : Bharat Live News Media.