कोल्हापूर : आयर्विन होस्टेल कंपाऊंडमधील ‘ती’ जागा दफनभूमीसाठी देण्याची मागणी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ख्रिस्ती दफनभूमीसाठी जीवनदान संस्थेने महापालिका प्रशासक के. मजूलक्ष्मी यांच्याकडे निवेदन दिले. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे. ख्रिस्ती दफनभूमीचा प्रश्न गंभीर बनल्याने तत्काळ आयर्विन ख्रिश्चन हॉस्टेल कंपाऊंडमधील २ एकर जागेत ख्रिस्ती दफनभूमी करावी, अशी मागणी जीवनदान सेवाभावी संस्थेने महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाव्दारे … The post कोल्हापूर : आयर्विन होस्टेल कंपाऊंडमधील ‘ती’ जागा दफनभूमीसाठी देण्याची मागणी appeared first on पुढारी.
कोल्हापूर : आयर्विन होस्टेल कंपाऊंडमधील ‘ती’ जागा दफनभूमीसाठी देण्याची मागणी

कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : ख्रिस्ती दफनभूमीसाठी जीवनदान संस्थेने महापालिका प्रशासक के. मजूलक्ष्मी यांच्याकडे निवेदन दिले. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
ख्रिस्ती दफनभूमीचा प्रश्न गंभीर बनल्याने तत्काळ आयर्विन ख्रिश्चन हॉस्टेल कंपाऊंडमधील २ एकर जागेत ख्रिस्ती दफनभूमी करावी, अशी मागणी जीवनदान सेवाभावी संस्थेने महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. कळंबा येथील जागेवरुन होणारा वाद टाळण्यासाठी हा पर्याय योग्य असून ख्रिस्ती समाज, नागरिकांचीदेखील अशीच इच्छा आहे. ख्रिस्ती समाजाची ही जागा बिल्डर किंवा धनदांडग्यांच्या घशात जाण्यापेक्षा या जागेचा वापर ख्रिस्ती दफनभूमीसाठी करणे योग्य होईल. या जागेमुळे कोणत्याही रहिवास विभागाला त्रास होणार नाही आणि ख्रिस्ती दफनभूमीचाही प्रश्न सुटेल, असा दावा या संस्थेने केला आहे.
Latest Marathi News कोल्हापूर : आयर्विन होस्टेल कंपाऊंडमधील ‘ती’ जागा दफनभूमीसाठी देण्याची मागणी Brought to You By : Bharat Live News Media.