रामराज्य की गुंडा राज्य : नाना पटोलेंचा राज्य सरकारवर घणाघात

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : लोकशाही विचाराला तिलांजली देत येड्याचं सरकार ती संपवण्याचे काम करत आहेत. अशा सरकारला तत्काळ बरखास्त करायला पाहिजे. सत्तेच्या गर्मीचा हा प्रत्यय आहे, आम्ही स्वच्छ आणि रामराज्य चालवतो म्हणतात पण आता या घटनेवरून हे गुंडाराज सुरू असल्याचे दिसते, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राज्यातील सरकार लुटेरे आणि डाकू आहे. … The post रामराज्य की गुंडा राज्य : नाना पटोलेंचा राज्य सरकारवर घणाघात appeared first on पुढारी.

रामराज्य की गुंडा राज्य : नाना पटोलेंचा राज्य सरकारवर घणाघात

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकशाही विचाराला तिलांजली देत येड्याचं सरकार ती संपवण्याचे काम करत आहेत. अशा सरकारला तत्काळ बरखास्त करायला पाहिजे. सत्तेच्या गर्मीचा हा प्रत्यय आहे, आम्ही स्वच्छ आणि रामराज्य चालवतो म्हणतात पण आता या घटनेवरून हे गुंडाराज सुरू असल्याचे दिसते, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
राज्यातील सरकार लुटेरे आणि डाकू आहे. असे आम्ही आजवर अनेकदा बोललो आहे. जो कोणी आमदाराचं एकत नसेल, मग आयपीएस अधिकारी किंवा कोणी असेल त्याची तत्काळ बदली करा. पोलिसांवर भयानक दबाव जो कधी नव्हे, ते आता आपण बघत आहोत. पोलिसांनी कोणतेही काम करु नये, अशा पद्धतीचे दबावतंत्र गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडून सुरू आहे.
महाविकास आघाडी वाटाघाटी बाबतीत छेडले असता पटोले म्हणाले, अॅड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आहेत. कालची बैठक महाविकास आघाडीची बैठक होती. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक होते, हा काय प्रकार आहे? आम्ही कोणाला बळजबरी करु शकत नाही. केंद्र सरकारचे हे शेवटचे बजेट होते. नरेंद्र मोदी सरकारला पुढचे बजेट ठेवायला मिळणार नाही. महायुतीमध्ये काय चाललं आहे? हे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून दिसून आले. दुसरीकडे महाविकास आघाडीत काहीच अडचण नाही. आम्ही ४८ जागा लढू आणि जिंकू, असा दावा पटोले यांनी केला.
हेही वाचा 

पाेलीस ठाण्‍यात गोळीबार : भाजप आमदार गणपत गायकवाडांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
उल्हासनगर गोळीबार प्रकरण, जखमी महेश गायकवाडांची मुख्‍यमंत्री शिंदेंनी घेतली भेट
BJP Bawankule : उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील दोषींवर कारवाई होणार; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 

Latest Marathi News रामराज्य की गुंडा राज्य : नाना पटोलेंचा राज्य सरकारवर घणाघात Brought to You By : Bharat Live News Media.