उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील दोषींवर कारवाई होणार : भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : उल्हासनगर हल्ला प्रकरणी राजकीय वातावरण तापले असतानाच आमदार गणपत गायकवाड यांची चूक निघाली तर सरकार योग्य ती कारवाई करणारच, असे स्पष्ट मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सखोल चौकशी करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कोराडी (नागपूर) येथे ते माध्यमांशी बोलत होते. मी घेतलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांच्या जिवावर आले म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले, असे गायकवाड म्हणत आहेत. यामुळेच सखोल चौकशी झाल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचता येणार नाही. . हे संस्कार आपले नाहीत. समाजापर्यंत वाईट संदेश पोहोचू नये. यात ज्याची चूक असेल त्यांच्यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, असेही ते म्हणाले, अशा घटनांमुळे पक्षाची काही प्रमाणात बदनामी होते. मात्र चौकशी होऊन घटना समजून घेतली जाईल.विरोधी पक्षाचे कामच राजीनाम्याची मागणी करण्याचे आहे, असे ते म्हणाले.
अडवाणी यांना भारतरत्न अभिमानाची बाब!
या देशाचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याची घोषणा अत्यंत आनंददायी, सुखद व अभिमानाची बाब आहे. अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.
Latest Marathi News उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील दोषींवर कारवाई होणार : भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे Brought to You By : Bharat Live News Media.