रायगड: महाडमध्ये बंद घराचा दरवाजा तोडून ९ लाखांचा ऐवज लंपास
महाड; Bharat Live News Media वृत्तसेवा : महाड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या प्रभात कॉलनीच्या साई पॅलेस इमारतीत राहणाऱ्या सेहूल सुभाष शेठ यांच्या घराचा दरवाजा तोडून सोने-चांदी व रोख रक्कम तिजोरीसह लंपास केली. यात ९ लाखांचे दागिने व रोख रक्कम लांबविल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकार आज (दि.३) उघडकीस आला आहे. परिसरात अन्य दोन ठिकाणी घकफोडीचा प्रयत्न झाला आहे.
यासंदर्भात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे साई पॅलेस या प्रभात कॉलनीतील पहिल्या मजल्यावर राहणारे सेहूल शेठ आपल्या कुटुंबासमवेत तुळजापूर येथे गेले होते. आज पहाटे चारच्या सुमारास ते घरी परतले असता घराचा दरवाजा तोडला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
दरम्यान, या इमारतीमधील सीसीटीव्ही काही दिवसांपासून बंद आहेत, याचाच फायदा चोरट्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. अन्य इमारतींच्या व दुकानांच्या सीसीटीव्हीतून दोन संशयित आणि एक वाहन संशयास्पद दिसून आले आहे. महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तडवी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाला पाचारण केले आहे. प्रभात कॉलनी परिसरातील अन्य दोन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा
पन्हाळा, रायगड, शिवनेरीसह १२ किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत घ्या; केंद्र सरकारची शिफारस
रायगड : महाडमधील गादी कारखान्याला भीषण आग; शेजारचे एक दुकान भस्मस्थानी
Raigad : किल्ले रायगडसह ९ किल्ल्यांवर राष्ट्रध्वजासह भगवा फडकविला
Latest Marathi News रायगड: महाडमध्ये बंद घराचा दरवाजा तोडून ९ लाखांचा ऐवज लंपास Brought to You By : Bharat Live News Media.