Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बिहारमधील महाआघाडी सरकारमधून बाहेर पडत भाजपशी घरोबा करत जनता दल (संयुक्त)चे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद कायम राखले. यानंतर त्यांना गृहमंत्री पद गमावावे लागले. भाजप यावर दावा सांगेल, अशा चर्चेला बिहारमधील राजकारणात उधाण आलं होते. मात्र या सर्व चर्चाच राहिल्या आहेत. नितीश कुमारांनी रविवार, ४ फेब्रुवारी रोजी होणार्या मंत्रीमंडळ विस्तारापूर्वीच आज ( दि.३ ) खाते वाटप जाहीर केले. बिहारमधील गृह खाते आपल्याकडे राखण्यात त्यांना यश आले आहे. भाजपचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना अर्थखात्यांसह ९ खाती देण्यात आली आहेत. ( Bihar Cabinet Portfolio Allocation : Nitish Kumar retains Home ) तर दुसरे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्याकडे महसूलसह अन्य ९ विभागांचा कार्यभार साेपविण्यात आला आहे.
नितीश कुमारांनी ‘ही’ खाती ठेवली आपल्याकडे
नितीश कुमारांनी आठ मंत्र्यांना खात्यांचे वाटप करताना सामान्य प्रशासन, गृह, कॅबिनेट सचिवालय, देखरेख आणि निवडणूक ही खाती आपल्याकडेच ठेवली आहेत. नवीन सरकारच्या स्थापनेनंतर भाजप गृह खात्यावर दावा करेल, असे म्हटले जात होते. मात्र नितीश कुमार यांनी यावेळीही सर्वाधिक चर्चेत असलेले गृह खाते स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवले आहे.
भाजपच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे प्रत्येकी नऊ विभाग
भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे अर्थ, वाणिज्य, शहरी विकास आणि गृहनिर्माण, आरोग्य, क्रीडा, पंचायती राज, उद्योग, पशु आणि मत्स्यसंपदा आणि कायदा विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर दुसरे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांना कृषी, रस्ते बांधकाम, महसूल आणि जमीन सुधारणा, ऊस उद्योग, खाण भूविज्ञान, कामगार संसाधने, कला, संस्कृती आणि युवा, लघु जलसंपदा आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी मंत्री करण्यात आले आहे. ( Bihar Cabinet Portfolio Allocation : Nitish Kumar retains Home )
महाआघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले विजय कुमार चौधरी यांना जलसंपदा, संसदीय कार्य, इमारत बांधकाम, परिवहन, शिक्षण आणि माहिती व जनसंपर्क मंत्री करण्यात आले आहे.
ऊर्जा खाते बिजेंद्रकुमार यादव यांच्याकडेच
महाआघाडी सरकारमध्ये ऊर्जामंत्री असलेले बिजेंद्रकुमार यादव यांच्याकडे यावेळीही ऊर्जा खात्याची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. याशिवाय त्यांना नियोजन आणि विकास, दारूबंदी, उत्पादन शुल्क आणि नोंदणी, ग्रामीण व्यवहार आणि अल्पसंख्याक विभागाचे मंत्री करण्यात आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रेम कुमार यांना सहकार, मागासवर्गीय आणि अत्यंत मागासवर्गीय कल्याण, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण, वन आणि हवामान बदल आणि पर्यटन खात्याचे मंत्री करण्यात आले आहे. ( Bihar Cabinet Portfolio Allocation : Nitish Kumar retains Home )
समाजकल्याण खाते जेडीयूकडे
जेडीयूचे ज्येष्ठ नेते श्रवण कुमार यांना ग्रामीण विकास, समाजकल्याण आणि अन्न व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री करण्यात आले आहे.
हिंदुस्थानी अवाम मोर्चाला माहिती व तंत्रज्ञान
NDA मित्रपक्ष हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष कुमार सुमन यांना माहिती- तंत्रज्ञान आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण विभागाचे मंत्री करण्यात आले आहे.
अपक्ष सुमति कुमार सिंहांकडे विज्ञान व तंत्रशिक्षण
अपक्ष आमदार सुमित कुमार सिंह यांना विज्ञान, तंत्र व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री करण्यात आले आहे.
STORY | Portfolios allocated in Bihar cabinet; Nitish retains home, BJP gets finance, health
READ: https://t.co/ZNgvRL645F
(PTI File Photo) pic.twitter.com/plslatonJx
— Press Trust of India (@PTI_News) February 3, 2024
हेही वाचा :
नितीश कुमारांच्या ‘यू-टर्न’चे राहुल गांधींनी सांगितले कारण; म्हणाले….
‘तुम्हाला हिंदी भाषा समजली पाहिजे’ : नितीश कुमार ‘द्रमुक’ नेत्यावर भडकले
BJP Bihar Politics : नितीश कुमारांना पर्याय सम्राट चौधरी? ‘असे’ असेल भाजपचे नवे राजकारण
Latest Marathi News नितीश कुमारच बिहारचे ‘फौजदार’, गृह खाते स्वत:कडे राखले..! Brought to You By : Bharat Live News Media.