गालफुगीच्या आजाराने विद्यार्थी झाले बेजार; विद्यार्थ्यांवर शाळेतच उपचार

खेड : पुढारी वृत्तसेवा : खेड (ता.कर्जत) येथील केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना सध्या गालफुगी (गालगुंड) आजाराने बेजार केले आहे. त्यांच्यावर आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी शाळेत जाऊन उपचार केले. शाळेतील निम्म्या विद्यार्थ्यांना गालफुगी झाल्याने शाळेतील उपस्थिती खालावली होती. यावर उपाय म्हणून मुख्याध्यापक सुनील गिरीगोसावी व शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड.विजय सोनवणे यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांवर शाळेतचउपचार शिबीर घेण्यात आले. … The post गालफुगीच्या आजाराने विद्यार्थी झाले बेजार; विद्यार्थ्यांवर शाळेतच उपचार appeared first on पुढारी.

गालफुगीच्या आजाराने विद्यार्थी झाले बेजार; विद्यार्थ्यांवर शाळेतच उपचार

खेड : Bharat Live News Media वृत्तसेवा : खेड (ता.कर्जत) येथील केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना सध्या गालफुगी (गालगुंड) आजाराने बेजार केले आहे. त्यांच्यावर आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी शाळेत जाऊन उपचार केले. शाळेतील निम्म्या विद्यार्थ्यांना गालफुगी झाल्याने शाळेतील उपस्थिती खालावली होती. यावर उपाय म्हणून मुख्याध्यापक सुनील गिरीगोसावी व शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड.विजय सोनवणे यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांवर शाळेतचउपचार शिबीर घेण्यात आले.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी तुषार केदार यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. खेड आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका महानंदा पवार, आरोग्यसेवक लखन जाधव यांनी त्यांना सहकार्य केले. या विद्यार्थ्यांना औषधोपचार करून घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिक्षक सत्यवान आनारसे, संदीपान गायकवाड, विकास घोगरे, शालेय व्यवस्थापण समितीचे उपाध्यक्ष निशिकांत मोरे, दादा जावळे, जालिंदर खंडागळे उपस्थित होते.
हेही वाचा

नगरपंचायत कर्मचार्‍यांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा
आगामी विधानसभा लढविणारच : डॉ. प्रणोती जगताप
विश्वस्त नियुक्तीसाठी आळंदी देवस्थानची प्रक्रिया सुरू

Latest Marathi News गालफुगीच्या आजाराने विद्यार्थी झाले बेजार; विद्यार्थ्यांवर शाळेतच उपचार Brought to You By : Bharat Live News Media.