पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांच्या आगामी ‘अॅनिमल’ ( Animal ) चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. हा चित्रपट १ डिसेबर रोजी चाहत्यांच्या भेटीस येत आहे. अनिल कपूर आणि रणबीरसोबत चित्रपटात साऊथ स्टार रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता अभिनेत्री सलोनी बत्रा ही रणबीरच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे.
संबंधित बातम्या
सौ. प्रताप मानसी सुपेकर : अभिनेता प्रदीप घुलेने शेअर केले मालिकेतील अनुभव
Saqib Saleem : हुमा कुरेशीचा भाऊ साकिब सलीम स्वत:ला असा ठेवतो फिट
HBD Tusshar Kapoor : सिंगल पॅरेंट आहे तुषार कपूर, लग्नाशिवाय आयव्हीएफच्या माध्यमातून बनला होता पिता
अभिनेत्री, गायिका आणि डिझायनर सलोनी बत्रा तिच्या आकर्षक अभिनयाने चित्रपटसृष्टीत चर्चेत येत आहे. ‘सोनी’ (२०१८), ‘तैश’ ( २०२०), आणि ‘२०० : हल्ला हो’ ( २०२१) मधील तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आता आगामी ‘अॅनिमल’ (२०२३) या बहुप्रतिक्षित चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित आणि अभिनेता रणबीर कपूरसोबत अभिनय करत असलेल्या सलोनी बत्राचा इंडस्ट्रीतील प्रवास हा आता नव्या उंचीवर पोहोचणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटात सलोनीची भूमिका साकारत असून रणबीर कपूरच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. दोन कलाकारांमधील हे खास नात पडद्यामागील चित्रांमध्ये दिसून आले आहे. ज्यामुळे चित्रपटाच्या रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हे फोटो ऑन-स्क्रीन कनेक्शनच दाखवत नाहीत तर दोन्ही अभिनेत्यांनी त्यांच्या भूमिकेसाठी केलेले उल्लेखनीय प्रवास दाखवतात.
‘अॅनिमल’ मध्ये अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना आणि तृप्ती दिमरी यांच्या प्रमुख भूमिकांसह स्टार-स्टडेड कलाकार आहेत. ‘अॅनिमल’ ( Animal ) च्या ट्रेलरने आधीच धुमाकूळ घातला असून आता या पडद्यामागील BTS ने उत्साह वाढवला आहे. ‘अॅनिमल’ १ डिसेंबर २०२३ रोजी रिलीज होण्याच्या तयारीत असताना चाहते उत्सुक आहेत. सलोनी बत्रा रणबीर कपूरची बहीण कशी बनली? हे पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
The post रणबीर कपूर- सलोनी बत्राचे ‘अॅनिमल’ मधील कमाल BTS appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांच्या आगामी ‘अॅनिमल’ ( Animal ) चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. हा चित्रपट १ डिसेबर रोजी चाहत्यांच्या भेटीस येत आहे. अनिल कपूर आणि रणबीरसोबत चित्रपटात साऊथ स्टार रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता अभिनेत्री सलोनी बत्रा ही रणबीरच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. संबंधित …
The post रणबीर कपूर- सलोनी बत्राचे ‘अॅनिमल’ मधील कमाल BTS appeared first on पुढारी.