नगरपंचायत कर्मचार्‍यांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल, कर्जत नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांनी शुक्रवारी(दि.2) पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून निषेध केला. हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करणारे निवेदन प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना देण्यात आले. नामदेव राऊत यांच्यावर नगरपंचायतीच्या महिला अधिकार्‍याने खोटी तक्रार दिली आहे. त्यामुळे हा गुन्हा … The post नगरपंचायत कर्मचार्‍यांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा appeared first on पुढारी.

नगरपंचायत कर्मचार्‍यांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

कर्जत : Bharat Live News Media वृत्तसेवा : कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल, कर्जत नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांनी शुक्रवारी(दि.2) पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून निषेध केला. हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करणारे निवेदन प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना देण्यात आले. नामदेव राऊत यांच्यावर नगरपंचायतीच्या महिला अधिकार्‍याने खोटी तक्रार दिली आहे. त्यामुळे हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी सर्व कर्मचार्‍यांनी केली आहे.
यावेळी राकेश गदादे, संतोष समुद्र, ए. एम. गिते, ए. एस. मोहोळकर, एस. आर. राऊत, बी. एम. शिंदे, बुवासाहेब कदम, सुनील नेवसे, रवींद्र साठे, सुरेश धुमाळ, अवधूत कदम, सचिन पवार, कुंडलिक पवार, किशोर भैलुमे, आनंदा धांडे, तात्या समुद्र, सुमित जाधव, अशोक जाधव, महिला कर्मचारी सुमन भैलुमे, मंगल लोंढे, लीला कांबळे, लैला थोरात,कमल भिसे, यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष कर्मचारी उपस्थित होते. निवेदनामध्ये म्हटले आहे की, नगरपंचायतीच्या महिला अधिकार्‍याने राऊत यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा व विनयभंगाची खोटी तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे.
वास्तविक पाहता असा कोणताही प्रकार नगरपंचायत कार्यालयात घडलेला नाही. राऊत हे नगरसेवक असून, आयकर विभागाने नगरपंचायतीचे बँक खाते सील केल्याने, चर्चा करत असताना यावेळी शाब्दिक वाद झाला. मात्र, यामधून शासकीय कामकाजात अडथळा होण्यासारखा किंवा विनयभंगाचा कोणताही प्रकार घडलेला नाही. यामुळे अशा पद्धतीने खोटी तक्रार करणार्‍या महिला अधिकार्‍याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी आकस मनात ठेवून द्वेषापोटी राऊत यांच्याविरुद्ध खोटी तक्रार केली आहे. त्यामुळे हा खोटा गुन्हे रद्द करावा, अशी मागणी सर्व कर्मचार्‍यांनी केली.
अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू
महासंग्राम युवा मंचनेही खोटा गुन्हा दाखल केल्याचा निषेध केला आहे. मंचनेही पोलिस ठाणे व तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. सदर गुन्हे मागे न घेतल्यास महिला अधिकार्‍याविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू, असा इशारा निवेदनातून दिला आहे. त्यावर रोहन कदम, सतीश समुद्र, संपत नेवसे, योगेश नेवसे, महादेव खंडारे, भूषण ढेरे, प्रभाकर पवार, छगन येवले, रामदास हजारे यांच्या सह्या आहेत.
हेही वाचा

NMC News : नगररचना उपसंचालक, सहायक संचालकांच्या अधिकारात कपात
विश्वस्त नियुक्तीसाठी आळंदी देवस्थानची प्रक्रिया सुरू
जेजुरी परिसरात दुष्काळाच्या झळा : नागरीकांचे हाल

Latest Marathi News नगरपंचायत कर्मचार्‍यांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा Brought to You By : Bharat Live News Media.